jhimma 2 team celebration over box office big clash between sam bahadur and animal SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: तिसऱ्या आठवड्यात 'झिम्मा 2'चे शो वाढवले, हेमंत ढोमे आणि 'मराठी पोरीं'चं रॉकींग सेलिब्रेशन

बॉलिवूडच्या दोन बड्या सिनेमांना झिम्मा 2 ने तगडी फाईट दिलीय

Devendra Jadhav

Jhimma 2 Celebration News: एकीकडे रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल'  सिनेमा तर दुसरीकडे विकी कौशलचा सॅम बहादूर. दोन बडे सिनेमे २ डिसेंबरला एकत्र रिलीज झाले. या दोन सिनेमांसमोर २४ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या झिम्मा 2 चा कसा निभाव लागणार याची सर्वांना धाकधूक होती.

पण आता झिम्मा 2 ने दोन्ही बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींना तगडी स्पर्धा देत थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी मिळवली. यानिमित्ताने झिम्मा 2 च्या टीमने खास सेलिब्रेशन केलंय.

दोन बड्या बॉलिवूड सिनेमांशी स्पर्धा

झिम्मा 2 चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस 'झिम्मा 2' बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत.

खरंतर 'झिम्मा 2'ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण 'झिम्मा'ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते.

शिवाय 'झिम्मा 2' सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत.

झिम्मा 2 चे शो वाढवले

हेमंत पुढे म्हणतो, "प्रेक्षक आजही 'झिम्मा 2'ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत 'झिम्मा 2' स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसऱ्या आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.''

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचं हाऊसफुल्ल प्रेम मिळवत आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत.

कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकंदरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा 'झिम्मा 2' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT