Jiah Khan Case Verdict
Jiah Khan Case Verdict Esakal
मनोरंजन

Jiah Khan Case Verdict: जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता..

Vaishali Patil

दहा वर्षांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालय अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी आज कोर्टान निकाल दिला. आज संपुर्ण देशाच लक्ष जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालाकडे लागून होते. याप्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

3 जून 2013 रोजी अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या मुंबईतील घरी सापडला होता. गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याचा निकाल २८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता.

अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली याच्यावर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जियाने सूरज पांचोली विरोधात लिहिलेल्या सहा पानी पत्राच्या आधारे सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, 10 जून 2013 रोजी तपास सुरू करणाऱ्या मुंबई पोलिसांनी जप्त केलेले पत्र जिया खानने लिहिले होते. सीबीआयने असा दावा केला आहे की या पत्रात "सूरज पांचोलीशी जवळचे संबंध, शारीरिक शोषण आणि मानसिक आणि शारीरिक छळ" याबद्दल लिहिलेलं आहे, ज्यामुळे तिने आत्महत्या केली.

सीबीआयच्या आरोपपत्रात दाखल केलेल्या या पत्रात अभिनेत्रीने पांचोलीवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. या पत्राने प्रकरणाला नवे वळण आले होते आता या प्रकरणात कोर्टाने महत्वपुर्ण निर्णय दिला आहे.

जियाची आई या निकालाला आव्हान देवु शकते.

जियाने 2007 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'निशब्द' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. जियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जियाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर जिया खान 2008 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'गजनी'मध्ये आमिर खानसोबत दिसली. त्यानंतर तिला खरी ओळख मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update: स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

SCROLL FOR NEXT