Jiah Khan Esakal
मनोरंजन

Jiah Khan Case : 'लढा सुरूच राहील', सूरज पांचोलीच्या निर्दोष सुटकेवर जियाच्या आईची प्रतिक्रिया

Vaishali Patil

Jiah Khan Death : अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात मुंबईच्या सीबीआय विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे. सूरज पांचोलीवर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. 2019 पासून सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आज निर्णय आला आहे.

3 जून 2013 रोजी अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या मुंबईतील घरी सापडला होता. गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याचा निकाल २८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता. त्यानंतर कोर्टानं हा निकाल दिला.

तर दुसरीकडे जिया खानच्या आईची मात्र न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा भंग झाली असल्याचं सांगत दिसत आहे. जियाची आई राबिया सुरुवातीपासून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगत आहे.

राबिया यांनी याआधीही तिच्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली होती. दरम्यान आता आलेल्या या निकालानंतर त्यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. ते या निकाला आव्हान देणार असून आता हायकोर्टात त्या याचिका दाखल करणार आहे.

सूरज पांचोलीच्या निर्दोष सुटकेवर जिया खानच्या आईने आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितलं. राबिया खान म्हणाल्या, 'मी सुरुवातीपासूनच सांगत आहे की, हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं नाही, तर हत्या आहे. हे खुनाचे प्रकरण आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. माझा लढा सुरूच आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलीसाठी का नाही लढणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT