jitendra joshi gave surprise to all contestant in Bigg Boss Marathi 4  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4:जितूच्या सरप्राइजने स्पर्धकांना अश्रु अनावर.. काय केलं असं?

अभिनेता जितेंद्र जोशीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात हजेरी लावत सर्वांना मोठा धक्का दिला.

नीलेश अडसूळ

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व चांगलेच रंगत आहे. गेले काही दिवस घरात कॅप्टनसी टास्कची लगबग सुरू होती. यावेळी किरण मानेचा पराभव करून रोहित शिंदे नुकताच कॅप्टन झाला. यानंतर काल घरात एक नवा पाहुणा आला. अभिनेता जितेंद्र जोशीच्या एंट्रीने सर्वांना मोठा आनंद झाला. पण त्याने येताना एक टास्क आणि एक सरप्राइज घेऊन आला. त्याच्या सरप्राइजने स्पर्धक ढसाढसा रडले.

(jitendra joshi gave surprise to all contestant in Bigg Boss Marathi 4 )

स्पर्धकांनी जितेंद्रचे (bigg boss marathi) जय्यत स्वागत केले. त्यानंतर "टारगेट टास्क" नह खेळ त्याने स्पर्धकांना दिला. या खेळात एका स्पर्धकाचे हात बांधले जाणार असून दुसऱ्या स्पर्धकाने त्याला पाण्याने भरलेले फुगे फेकून मारायचे होते. हा टास्क डेंजर असला तरी सगळे स्पर्धक तो भरपूर एन्जॉय केला. पण नंतर जितू म्हणाला 'हे तर काहीच नाही. मी यापुढे जे करणारे ते यापेक्षा डेंजर असेल. तो मार असा बसेल की...' ही ऐकून स्पर्धक गप्प झाले. ही सरप्राइज नेमकं काय असेल याबाब स्पर्धक चिंतेत पडले. पण पण जेव्हा ही सरप्राइज समोर आलं तेव्हा मात्र स्पर्धकांना अश्रु अनावर झाले.

जितेंद्र जोशीने सदस्यांना एक सरप्राइज दिले. त्याने सस्यांना सांगितले की , "मी तुमच्या कुटुंबियांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे त्यांनी पत्र लिहिली आहेत तुमच्यासाठी. ज्याच्या हातात रिंग राहील त्या विजेत्यालाच पत्र मिळणार.' ही ऐकून स्पर्धक भावूक होतात. यावेळी आपल्या घरच्यांनी लिहिलेलं पत्र वाचण्यासाठी अक्षय आणि अपूर्वा प्रचंड जीव लावून खेळतात, पण यानंतर सर्वच स्पर्धकांना आपल्या घरच्यांनी दिलेली पत्र मिळतात आणि स्पर्धक रडू लागतात. नंतर जितेंद्र जोशी "एकांत" ही कविता सादर करून ती ऐकून पुन्हा ईमोशनल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT