jitendra joshi gives target task to contestant in Bigg Boss Marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: तो मार असा बसेल की.. जितेंद्र जोशीच्या त्या वाक्याने हादरले सदस्य

बिग बॉसच्या घरात जितेंद्र जोशीची एंट्री.. स्पर्धकांना देणार टारगेट टास्क..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व चांगलेच रंगत आहे. गेले काही दिवस घरात कॅप्टनसी टास्कची लगबग सुरू होती. कालच्या भागात बिग बॉसच्या घरात 'वॅलेनटाईन डे' साजरी झाला. या निमित्ताने स्पर्धकांना एक भन्नाट कॅप्टनसी टास्क खेळावा लागला. त्यांना कॅप्टनसी साठी 'टेडीबेअर' बनवण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी अत्यंत उत्तम खेळी करून डॉ. रोहित शिंदे पुन्हा एकदा घराचा कॅप्टन झाला. पण आज घरात वेगळेच कार्य रंगणार आहे, आणि त्यासाठी एक खास पाहुणा बिग बॉस च्या घरात आला आहे.

(jitendra joshi gives target task to contestant in Bigg Boss Marathi 4)

बिग बॉसच्या घरात आज सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी येणार आहे. सध्या तो त्याच्या 'गोदावरी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वत्र फिरत आहे. याच निमित्ताने तो बिग बॉस च्या घरात आला होता, यावेळी त्याने स्पर्धकांची चांगलीच बोलती बंद केली.

जितेंद्रचे जय्यत स्वागत झाल्यानंतर तो स्पर्धकांना एक टास्क देतो. या टास्कचे नाव "टारगेट टास्क" असून या खेळात एका स्पर्धकाचे हात बांधले जाणार असून दुसऱ्या स्पर्धकाने त्याला पाण्याने भरलेले फुगे फेकून मारायचे आहेत. हा टास्क डेंजर असला तरी सगळे स्पर्धक तो एन्जॉय करताना दिसत आहेत. पण तेव्हाच अमृता धोंगडे बोलते सर तुम्ही पण एक फुगा मारून पहा.. त्यावेर जितेंद्र जोशी स्पर्धकांना म्हणतो, 'हे तर काहीच नाही. मी यापुढे जे करणारे ते यापेक्षा डेंजर असेल. तो मार असा बसेल की...' ही ऐकून स्पर्धक गप्प होतात.

या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. आता अभिनेते जितेंद्र जोशी स्पर्धकांना नक्की कोणता टास्क देणार, तो कशासाठी असेल, कोणता स्पर्धक तो टास्क जिंकेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT