Jiya Shankar had panic attack in Bigg Boss ott 2 house, contestant worried  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 Jiya Shankar:वेड मधील जिया शंकरवर बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रसंग, सदस्यांना काळजी

जियाला बिग बॉसच्या घरात एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलंय.

Devendra Jadhav

Bigg Boss OTT 2 Jiya Shankar News: वेड सिनेमातली निशा आठवते. जिच्यामुळे रितेश देशमुखला गुंडांचा मार खावा लागला. आता हीच निशा म्हणजेच अभिनेत्री जिया शंकर बिग बॉसमध्ये सहभागी आहे. बिग बॉस OTT चा दुसरा सिझन सध्या सुरु आहे.

यात जिया शंकर सहभागी आहे. पण जियाला बिग बॉसच्या घरात एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलंय. यामुळे तिच्या कुटुंबियांना तिची चिंता वाटू लागलीय.

(Jiya Shankar had panic attack in Bigg Boss ott 2 house, contestant worried)

बिग बॉस OTT सीझन 2 चा नवीन प्रोमो रिलीज झाला. त्या प्रोमोमध्ये, सर्व घरातील सदस्य अ‍ॅक्टिव्हिटी एरियात दिसत आहेत. प्रत्येकजण वर्तुळात उभा आहे.

बिग बॉस म्हणतात, 'सर्कल आणि सत्यात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.' आता पुढे काय होते, हे शोच्या टेलिकास्टनंतरच कळेल. पण याच प्रोमो मध्ये जिया शंकर रडताना दिसत आहे. आकांक्षा पुरी तिला शांत करताना दिसते.

प्रोमोमध्ये बघायला मिळतं कि, जिया शंकर रडतेय आणि तिला श्वास घेता येत नाही. तिची घुसमट होताना दिसतेय. तिला त्या खोलीतून बाहेर जायचे आहे.

तसेच ऍक्टिव्हिटी एरियाचा दरवाजा उघडण्यास सांगते. यानंतर मनीषा राणीही जियाकडे जाते आणि विचारते काय प्रॉब्लेम आहे. ती बिग बॉसला देखील सांगते की जियाला थोडा त्रास होत आहे, तिला बाहेर पडायचे आहे.

त्याच वेळी, जिया रडत रडत म्हणते की तिला श्वास घेता येत नाही, बिग बॉस कृपया दरवाजा उघडा.

दुसरीकडे तिच्या बाजूला उभा असलेला जद हबीब तिला एकटे सोडण्यास सांगतो. तिच्यापासून दूर राहा म्हणजे श्वास घेता येईल. कारण आकांक्षा आणि मनीषा अगदी तिच्याजवळ उभ्या होत्या. आता जियाला होणार हा त्रास बघता बिग बॉस काय पाऊल उचलणार हे येत्या एपिसोड्समध्ये कळेल. जियाला पॅनिक अटॅक आल्याचं बोललं जातंय. सध्या या नॉमिनेशन टास्कमध्ये जिया शंकर आणि आलिया सिद्दीकी नॉमिनेट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT