jl50 review.jpg 
मनोरंजन

JL50 review: 35 वर्षांपूर्वी हायजॅक झालेल्या विमानाची रंजक गोष्ट

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- सगळं काही आलबेल असून चालत नाही. सतत वेगळेपण शोधण्याच्या प्रयासात असलेली विक्षिप्त माणसं काही ना काही शोधून काढतात. आपण जे शोधले ते समस्त मानवजातीसाठी उपयोगात न आणता स्वार्थी भावनेतून त्यांच्या मेंदुत विषारी विचार डोकावू लागतात. जे एल 50 गोष्ट आहे 35 वर्षांपूर्वी हायजॅक झालेल्या विमानाची. कोलकाता ( तेव्हाचे कलकत्ता) येथून टेक ऑफ केलेल्या विमानाचा 35 वर्ष काही थांगपत्ता लागत नाही. याच्या शोधाचा हा सगळा प्रवास भन्नाट आणि विस्मयाचा अनुभव देणारा आहे. सध्या ही वेबसीरीज दर्शकांच्या पसंतीस उतरली आहे. 
 
कृषी विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ; एनडीएकडे नाही बहुमताचा आकडा  

शैलेंद्र व्यास दिग्दर्शित या मालिकेत सीबीआय अधिका-याच्या भूमिकेत अभय देओल, राजेश शर्मा, शास्त्रज्ञाच्या भूमिकेत पियुष मिश्रा, भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाच्या भूमिकेत पंकज कपूर आणि वैमानिकाच्या भूमिकेत रितीका आनंद दिसणार आहेत. वास्तविक ज्यांनी बॅक टू द फ्युचर सारखा चित्रपट, द डार्क सारखी वेब सीरीज पाहिली असेल त्यांना जेएल 50 फारसा वेगळा वाटणार नाही. मात्र तरीही भारतीय वेब सीरीजच्या दुनियेत टाईम ट्रॅव्हलचा होणारा वेगळा होणारा प्रयोग म्हणून या सीरीजकडे पाहता येईल. 2019 मध्ये क्रॅश झालेल्या विमानाचा तपास करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली जाते. त्या तपासातून 35 वर्षांपूर्वी एक विमान हायजॅक झाले. मात्र ते काही लँड झाले नाही अशी धक्कादायक माहिती समोर येते. अशा पध्दतीने आपण प्रेक्षक म्हणून जेएल 50 मध्ये प्रवेश करुन आगळया वेगळ्या अनुभवाला सामोरे जातो. 

या मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास एका वेगळ्या प्रकारचा फील घेण्यासाठी रसिकांनी ती जरुर पहावी. यात कलाकारांचा अभिनय प्रशंसनीय आहे. त्यांच्या अभिनयाचा छाप शेवटपर्यंत आपल्या मनावर राहतो. साय फाय चित्रपटात विशेष रस असणा-यांना यात अनेक त्रुटी सापडतील काही अंशी ते खरेही आहे. परंतु नेहमीची वाट सोडून थोड्याशा वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणा-यांसाठी जेएल बेस्ट ऑप्शन आहे. आतापर्यत आपल्याकडे टाईम ट्रॅव्हल सारख्या संकल्पनेवर तयार झालेली मालिका किंवा चित्रपट रसिकांना फारसा रुचलेला नाही. किंबहुना तो आपल्याकडे तयार करण्याच्या फंद्यात कुणी पडलेले नाही. 

बिथरलेल्या पाकिस्तानची नवी खेळी; खोब्रागडेंना नाकारला व्हिसा

चार भागात असलेल्या या मालिकेतून रसिकांना वेगळं काही पाहिल्याचे समाधान लाभेल. 35 वर्षांपूर्वी हायजॅक झालेले विमान पुन्हा सापडते का, त्यात हरवलेली माणसे एकमेकांना भेटतात का, मालिकेत दाखविण्यात आलेला टाईम ट्रॅव्हल नक्की कुणाचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला जेएलच्या वाट्याला जावे लागेल. दिग्दर्शक शैलेंद्र व्यास यांनी एक अनोखा प्रयोग या माध्यमातून केला आहे. ही मालिका पाहताना तिचा कालावधी जास्त हवा होता असे वाटून जाते. केवळ चार भागांमध्ये उरकलेली ही मालिका काही काळ रेंगाळते. पात्रांची निवड, लोकेशन, संवाद, कॅमेरा, संकलनाची बाजू उत्तमरित्या सांभाळण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : अधिकारी-कर्मचारी महासंघाचा उद्यापासून ‘कामबंद’चा इशारा

SCROLL FOR NEXT