Joe Jonas Sophie Turner Divorce Esakal
मनोरंजन

Joe Jonas Sophie Turner Divorce: प्रियंकाच्या जाऊबाई घेणार घटस्फोट ? गेम ऑफ थ्रोन्सच्या सान्साची केलीय भूमिका!

Vaishali Patil

Joe Jonas Sophie Turner Divorce: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ग्लोबल स्टार बनली आहे. प्रियंका आणि पती निक जोनास हे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहतात. मात्र सध्या प्रियंकाचे सासरचे कुटुंब चर्चेत आले आहे. निकचा मोठा भाऊ जो जोनास यांचे त्याच्या पत्नीसोबतचे नात्यात दुरावा आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जो आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री सोफी टर्नर यांच्यात मतभेद सुरु असून ते दोघेही घटस्फोट घेणार आहेत.

चार वर्षापुर्वी जो आणि सोफी लग्न बंधनात अडकले होते. चार वर्षातच त्याच्यात खटके उडू लागले. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या नात्यात काहीच चांगले नाही.

जोने लॉस एंजेलिसमधील वकिलाशी घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्यासाठी संपर्क साधला आहे. जो आणि सोफीला दोन मुली आहेत, एकीचे नाव विला आहे आणि दुसऱ्या मुलीचा जन्म गेल्या वर्षीच झाला होता.

सध्या सर्व विदेशी वृत्तवाहिनींवर दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. तरी अद्याप या जोडप्याने या बातमीवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांच्या सोशल मीडियावर नजर टाकली असता सोफीने 15 ऑगस्टला त्याचासोबतचा शेवटचा फोटो शेयर केला आहे.

जो आणि सोफी यांनी काही काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये त्यांनी लग्न केले. यावेळी निक जोनास आणि प्रियांका चोप्रा देखील सहभागी झाले होते.

करिअरबद्दल बोलायचे झालं तर जो आणि सोफी त्यांच्या करिअरमध्ये खूप सक्रिय आहेत. सोफी गेम्स ऑफ थ्रोन्ससारख्या मालिकांसाठी प्रसिद्ध आहे. दुसरीकडे, जो हा वर्ड टूरवर आहे.

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, जो जोनास ऑस्टिन, टेक्सास येथे जोनास ब्रदर्सच्या संगीत मैफिलीदरम्यान त्याच्या लग्नाची अंगठी परिधान केलेली होती. स्टेजवर परफॉर्म करताना जो जोनासचे अनेक फोटो व्हायरल झाले. यावेळी त्याच्या बोटात लग्नाची अंगठी घातलेली दिसली. जो जोनासच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT