John Abraham at anant ambani-radhika merchant engagement Google
मनोरंजन

John Abraham: 'झोपेतून उठून आलास काय..',अंबानींच्या सोहळ्यात जॉन अब्राहम ट्रोल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात अख्खं बॉलीवूड सामिल झालं होतं. सगळ्यांची प्रशंसा होत असताना एकटा जॉन मात्र लोकांना खटकला आहे.

प्रणाली मोरे

John Abraham: देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय आहे .अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

बॉलीवूड किंग शाहरुख खान पासून ते सलमान खान, कटरिना, दीपिका पदुकोण रणवीर सिंग या सारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र जॉन अब्राहमची हजेरी युजर्सना खटकली.(John Abraham at anant ambani-radhika merchant engagement)

उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी साखरपुडा धूमधडाक्यात पार पडला.अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये जॉन अब्राहमचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये जॉन जीन्स पँट आणि ब्लॅक कलरचे जॅकेट आणि पांढऱ्या कलरचे स्पोर्ट्स शूज घालून आला होता आणि पापाराझीला उपकार केल्यासारखे पोझ देत होता. युजर्सने त्याचे कपडे आणि पोझ पाहून त्याच्यावर जोरदार ट्रोलिंगचा मारा सुरू केला आहे.

हेही वाचा:मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

" जॉन काय झोपेतून उठून आला आहे का?" " हा असा उपकार केल्या सारखं का आला आहे" " सगळे कसे पारंपरिक पद्धतीने ड्रेसिंग स्टाइल करून आले आहेत हा का असा आला आहे " " आज चक्क स्पोर्ट्स शूज स्लिपर नाही का?" " जॉन फक्त फोटो काढण्यासाठी आला आहे आता का गेला नाही " " जॉन तुझं हसणंपण उपकार केल्या सारखं आहे." असं एकापाठोपाठ ट्रोल करत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केल्याचं दिसून आलं आहे. जॉनचा तो व्हिडीओ बातमीत जोडलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT