John Abraham Birthday property films lifestyle cars  sakal
मनोरंजन

John Abraham Birthday: वीस वर्षात जमवली कोट्यावधींची संपत्ती.. जॉनने मोडले सगळेच रेकॉर्ड..

अभिनेता जॉन अब्राहमचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संपत्तीविषयी..

नीलेश अडसूळ

John Abraham Birthday: एकेकाळी बॉलीवुडमध्ये दबदबा निर्माण करणारा आणि लाखों चाहते असणारा अभिनेता जॉन अब्राहम बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटात पदार्पण करत आहे. लवकरच तो शाहरुखच्या 'पठाण' सिनेमात झळकणार आहे. जॉनच्या मनोरंजन विश्वातील करकीर्दीला लवकरच वीस वर्षे होणार आहेत. या वीस वर्षात त्याने आपल्या कामातून कोट्यावधींची कमाई केली. आज जॉनचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया जॉनकडे नेमकी किती संपत्ती आहे..

(John Abraham Birthday property films lifestyle cars)

जॉनने २००३ मध्ये 'जिस्म' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी त्याने मॉडेल म्हणून इंडस्ट्रीत आपला जम बसवला होता. अभिनयात आल्यानंतर त्याने झोकून कामाला सुरवात केली आणि वीस वर्षात तो जवळपास 300 कोटींचा मालक झाला आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, जॉन तब्बल ३४ दशलक्ष युएस डॉलर्स म्हणजेच जवळपास 260 कोटींचा मालक आहे. एका चित्रपटासाठी तो जवळपास सहा ते सात कोटी रुपये मानधन घेतो.

अभिनयाशिवाय जॉन अनेक ब्रँड्सचा अॅम्बेसेडर असून त्यातून त्याची बरीच कमाई होते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो जवळपास एक कोटी रुपये मानधन घेतो. इतकंच नव्हे तर त्याचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊससुद्धा आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसने 'विकी डोनर' आणि 'मद्रास कॅफे' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. जॉन फिटनेस फ्रीक म्हणून ओळखला जातो. त्याला स्पोर्ट्सची खूप आवड असून इंडियन सुपर लीगमधील नॉर्थईस्ट युनायटेड एफसी या फुटबॉल संघाचा तो मालक आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक जॉन असून त्याचं वार्षिक उत्पन्न जवळपास १५.५ कोटी रुपये इतकं असून दरवर्षी हा आकडा वाढतोय. याशिवाय त्याच्याकडे अनेक गाड्या, महागड्या वस्तू संग्रही आहेत, ज्याची किंमतही कोटींच्या घरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT