john abraham 
मनोरंजन

शूटिंगदरम्यान जॉन अब्राहमला दुखापत; पोस्ट केला व्हिडीओ

स्वाती वेमूल

अभिनेता जॉन अब्राहमला शूटिंगदरम्यान जबर मार लागला आहे. त्याच्या आगामी 'अटॅक' या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. या चित्रपटातील एका अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान जॉनवर काचेच्या रॉडने हल्ला करण्यात येणार होता. ऐनवेळी तो रॉड जॉनच्या चेहऱ्याला लागला आणि रक्त येऊ लागलं. या शूटिंगचा फोटो आणि त्यानंतरचा व्हिडीओ जॉनने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

या फोटोमध्ये सहकलाकार जॉनच्या पाठीवर काचेच्या रॉडने मारताना दिसत आहे. तर नंतरच्या व्हिडीओमध्ये सेटवरील क्रू मेंबर जॉनची जखम पुसताना पाहायला मिळत आहे. 'कशी सुरुवात झाली आणि आता काय सुरू आहे. ही सर्व गंमत मला आवडतेय', असं कॅप्शन जॉनने या फोटो व व्हिडीओला दिलं आहे. 

अटॅक या चित्रपटात जॉनसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही मुख्य भूमिका आहेत. लक्ष्य राज आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन व लेखन केलं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वत: जॉनच करत आहे. 

जॉनच्या हातात इतरही काही चित्रपट आहेत. 'पठाण', 'एक व्हिलन रिटर्न्स', 'मुंबई सागा' आणि 'सत्यमेव जयते २' हे त्याचे चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अटॅकच्या शूटिंगपूर्वी जॉनने 'सत्यमेव जयते २' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्यमेव जयते' या चित्रपटाचा हा सीक्वेल असून यामध्ये मनोज वाजपेयी आणि दिव्या खोसला कुमार यांच्याही भूमिका आहेत. तर संजय गुप्ता दिग्दर्शित 'मुंबई सागा' चित्रपटात इम्रान हाश्मी, काजल अगरवाल, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, रोहित रॉय, गुलशन ग्रोवर आणि महेश मांजरेकर अशी कलाकारांची मोठी फौजच आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT