john abraham 
मनोरंजन

'उन्हाळा सुरु झाला वाटतं'; जॉन अब्राहमच्या 'हॉट' फोटोवर नेटकरी फिदा

सकाळ ऑनलाइन

अॅक्शन-थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या फिटनेसमुळेही अनेकदा चर्चेत असतो. जॉनने मॉडेलिंगपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली असून त्याच्या 'परफेक्ट' शरीरयष्टीवर लाखो तरुणी फिदा आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या जॉनने नुकताच त्याचा एक फोटो पोस्ट केला असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

इन्स्टाग्राम अकाऊंटवर जॉनने हा फोटो पोस्ट आहे. या फोटोमधील जॉनच्या हॉट अंदाजावर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. 'वॉर्डरोबसाठी वाट पाहतोय' असं कॅप्शन जॉनने या फोटोला दिलं आहे. तुझा फोटो कोणी काढला, असेही प्रश्न काही नेटकरी त्याला विचारतायत. तर उन्हाळा सुरु झाला वाटतं, असं म्हणत काहीजण मस्करी करतायत. 

जॉनच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तो 'अटॅक' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याच चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीनचं शूटिंग करत असताना जॉनला दुखापत झाली होती. याचं दिग्दर्शन लक्ष राज आनंद करणार असून चित्रपटाची निर्मिती धीरज वाधवान, अजय कपूर आणि जॉनची प्रॉडक्शन कंपनी करणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar: आधी पावसानं झोडपलं, आता भूकंपानं हादरलं पालघर; कासा, धुंदलवाडी परिसरात 3.1 रिश्टर स्केलचे धक्के

IND vs ZIM 2nd T20 LIVE: फ्रीमध्ये सामना कुठे पाहणार? वेळ, TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहिती

Live Updates Marathi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची खोटी पोस्ट करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

CJP Protest : आंदोलकांचा चेहरा स्कॅन करणाऱ्या AI चा दिल्ली पोलिसांकडून वापर; गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह, कसं कामं करत हे तंत्रज्ञान?

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

SCROLL FOR NEXT