John Abraham in a still from Mumbai Saga Google
मनोरंजन

'माझा उजवा पाय कापावा लागणार होता कारण..' जॉनचा धक्कादायक खुलासा

'Attack' या आपल्या सिनेमाच्या मुलाखतीच्या निमित्तानं अभिनेता जॉन अब्राहमनं सात वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

अभिनेता जॉन अब्राहमनं (John Abraham)नुकताच एक मोठा खुलासा केला आहे,आणि तो सर्वांनाच धक्का देणारा ठरलाय. त्यानं सांगितलं की, ''काही वर्षांपूर्वी Force2 च्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाली होती,तेव्हा चक्क डॉक्टरांनी त्याला त्याचा पाय कापावा लागेल असं सांगितलं होतं''. जॉननं अॅटॅक सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी भाष्य केले आहे. तो म्हणाला,''त्याच्या उजव्या पायाला गॅंगरीन झाला होता,त्यामुळे डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिलेला. तेव्हा त्यानं आवर्जुन नमूद केलं की,मी त्यानंतर प्रत्येक अभिनेत्याला खास करुन सांगतो की अॅक्शन सीक्वेन्स करताना स्वतःची खूप काळजी घ्या. कोणतीही एक चूक जीवावर बेतू शकते''.

जॉनचा Force 2 हा सिनेमा 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक स्पाय थ्रीलर कथानकावर बेतलेला सिनेमा होता. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनय देव नं केलं होतं. या सिनेमात जॉन सोबत सोनाक्षी सिन्हा,ताहिर राज भसिन असे कलाकार देखील होते. 2011 मध्ये आलेल्या Force सिनेमाचा हा सीक्वेल होता. फोर्समध्ये जॉनसोबत जेनेलिया डिसोझानं काम केलं होतं. पहिला 'Force' हा सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरला होता. जॉन या मुलाखतीत पुढे म्हणाला,''काही स्टंट्स खूप खतरनाक असतात. मला आठवतंय Force 2 च्या शूटिंग दरम्यान माझा गुडघा पू्र्ण चेपल्यासारखा झाला होता आणि त्याला गॅंगरिन झाल्यामुळे डॉक्टरांनी पुढचा धोका टाळण्यासाठी पाय कापण्याचा सल्ला दिला. मी जोरात तेव्हा ओरडलो होतो,''तुम्ही असं नाही करु शकत. पण मी मुंबईतील त्या रुग्णालयातील डॉक्टर्सचा आभारी आहे,त्यांनी माझा गुडघा वाचवला''.

जॉन पुढे म्हणाला,''ही घटना सात वर्षापूर्वीची आहे. मी देवाचे,डॉक्टरांचे आभार मानतो यासाठी. मी आज माझ्या स्वतःच्या दोन्ही पायांवर चालतोय,मी स्क्वॅट मारु शकतो आणि मी आता पूर्वीपेक्षा अधिक गतीनं सगळी काम करु शकतोय. मला अॅक्शन सिनेमात करायला आवडते. पण मी त्या घटनेनंतर काही दिवस ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा मी अॅक्शन मोडमध्ये आल्यानं मला खूप आनंद होतोय. शेवटी तुम्ही पाच माणसांना एकट्याने मारताना खूप फसवेगिरी करु शकत नाही. तुम्हाला इकडून तिकडे उड्या आवेगात माराव्याच लागतात. तेव्हा दुखापत होते. पण कदाचित तुम्हाला त्याचा धसका बसू शकतो. मलाही बसला होता. पण मी यातून सावरत आहे''.

जॉननं धूम,दोस्ताना,काबूल एक्सप्रेस,न्यूयॉर्क,वॉटर,नो स्मोकिंग,टॅक्सी ९२११,मद्रास कॅफे,बाटला हाऊस,सत्यमेव जयते,रोमिओ अकबर वॉल्टर आणि मुंबई सागा अशा अनेक सिनेमातून काम केलं आहे. लवकरच सिद्दार्थ आनंदच्या पठाण सिनेमात तो शाहरुख,दीपिकासोबत दिसणार आहे. पठाण २५ जानेवारी,२०२३ ला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT