johnny lever sidharth jadhav comedy chemistry aflatoon marathi movie trailer out now  SAKAL
मनोरंजन

Aflatoon Trailer: जॉनी लिव्हर - सिद्धूची 'अफलातून' कॉमेडी, मनोरंजन आणि कॉमेडीचा भन्नाट डोस, ट्रेलर पहाच

तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री ट्रेलर मध्ये दिसून येतेय.

Devendra Jadhav

Aflatoon Marathi Movie Trailer: ‘अफलातून’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन जीवलग मित्र एक केस कशी ‘अफलातून’ रीत्या हाताळतात  याची धमाल दाखविणारा ‘अफलातून’ हामराठी चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय.

तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञयांच्या उपस्थितीत  दिमाखदार कार्यक्रमातप्रकाशित झाला. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे.

साहा अँडसन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणिराजीव कुमार साहा चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाचीसहनिर्मिती करण्यात आली आहे.

(johnny lever sidharth jadhav comedy chemistry aflatoon marathi movie trailer out now )

तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री ट्रेलर मध्ये दिसून येतेय. त्यासोबत इतर पात्रांचा मजेशीर अंदाजहीपहायला मिळतोय.

प्रेक्षकांचं फूल्ल टू मनोरंजन करणारा हा चित्रपट असून ‘अफलातून’ मज्जा घ्यायची असेलतर चित्रपट नक्की बघा असं चित्रपटातील कलाकारांनी यावेळी आवर्जून सांगितलं. प्रत्येक कलाकाराच्या सळसळत्या ऊर्जेचं दर्शन ‘अफलातून’ चित्रपटातून दिसणार आहे.

श्री, आदिआणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. ही मदत करताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनीलिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस, अशीकलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असूनसंवाद संदीप दंडवते यांचे आहेत.  छायांकन सुरेशदेशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूतगुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे.

संगीताची जबाबदारी संगीतकारकश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सीयांचे आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजूवर्गीस यांचे आहे.

वेशभूषा मीनल डबराल गज्जर हिची असून कलादिग्दर्शन नितीन  बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए.ए.फिल्म्सने सांभाळली आहे.

मंगेश जगताप, सेजलपेंटर, शीला जगताप, अश्विनपद्मनाभन, सत्यनारायणमूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहेत. ‘अफलातून’ २१ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: सांगरूळ बंधाऱ्यामध्ये कुंभी नदीपात्रात कोंबड्यांचे वेस्टेज

SCROLL FOR NEXT