Manoj Bajpayee Movie News esakal
मनोरंजन

Bhaiyyaji Movie : मनोज वाजपेयीच्या '१००' व्या चित्रपटाची घोषणा, 'जोराम' नंतर करणार मोठा धमाका!

मनोजच्या 'त्या' चित्रपटातील भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक करण्यास सुरुवात केली आहे.

युगंधर ताजणे

Manoj Bajpayee : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी हा आता त्याच्या शंभराव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोजच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा रंगली होती. अखेर त्यानं पोस्ट शेयर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून मनोज वाजपेयीकडे पाहिले जाते. त्याच्या शूल, सत्या, गँग्स ऑफ वासेपूर, द फॅमिली मॅन, जोराम सारख्या कलाकृतीतून देखील प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. आता मनोजनं त्याच्या शंभराव्या प्रोजेक्टची घोषणा केली असून त्यानिमित्तानं चाहत्यांनी त्याला खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मनोज हा त्याच्या आगामी भैय्याजी नावाच्या चित्रपटातून समोर येणार आहे. त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून त्यातील मनोजची भूमिका चाहत्यांच्या कौतुकाचा आणि तितक्याचं कुतूहलतेचा विषय देखील आहे. गेल्या वर्षी मनोजच्या द फॅमिली मॅनचा दुसऱा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता त्याच्या तिसऱ्या सीझनचे चाहत्यांना वेध लागले आहेत.

आपल्या निवडक भूमिका आणि वैचारिक बैठक यासाठी लोकप्रिय असणाऱ्या मनोज वाजपेयीला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्याच्या जोराम नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये मनोजच्या जोरामला प्रेक्षकांनी उस्फुर्त दाद दिली होती. त्याचे कौतुकही झाले होते.

मनोजनं त्याच्या भैय्याजी चित्रपटाचा पोस्टर रिलीज करताना त्याची रिलिज डेटही सांगितली आहे. मनोजनं त्याच्या ऑफिशियली इंस्टावरुन तो फोटो शेयर केला होता. त्यावर त्यानं लिहिलं होतं की, आता ते येत आहे....असे म्हटले होते. त्यानंतर काही वेळानं त्यानं भैय्याजी नावाच्या चित्रपटाचे पोस्टरही शेयर केले होते. त्या पोस्टरमधील मनोजचा लूक खूपच वेगळ्या प्रकारचा आहे. तोंडात सिगारेट, गळ्यात गमछा आणि चेहऱ्यावर करारीपणा अशा लूकमध्ये मनोज हा काही वेगळाच दिसतो आहे. त्याचा भैय्याजी नावाचा चित्रपट २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा मनोजचा शंभरावा चित्रपट असणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

Beed Crime: बीडच्या कारागृहात ठाराविक कैद्यांचे लाड! खासदार सोनवणे अमित शाहांच्या भेटीला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Flood Alert : डिंभे धरणातून घोड नदीत १९,५४५ क्यूसेक विसर्ग; नदीकाठच्या ४४ गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT