journey marathi movie trailer shantanu moghe sharvari jamenis  SAKAL
मनोरंजन

Journey Trailer: हरवलेल्या मुलाला शोधणाऱ्या आई - बाबांची रहस्यमयी कहाणी, 'जर्नी'चा ट्रेलर प्रदर्शित, शंतनु मोघेंची प्रमुख भुमिका

जर्नी या मराठी सिनेमाचा थरारक ट्रेलर भेटीला आलाय

Devendra Jadhav

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात अनेक दर्जेदार आणि विविध विषयांवरचे सिनेमे भेटीला आले आहेत. काही दिवसांपुर्वी बाईपण भारी देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.

इतकंच नव्हे, तर काही दिवसांपुर्वी आलेल्या सुभेदार सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक गल्ला जमवला. अशातच वेगळ्या विषयावरचा आणखी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे जर्नी.

(journey marathi movie trailer shantanu moghe sharvari jamenis)

काय आहे जर्नी सिनेमाची कथा

जर्नी सिनेमाच्या थरारक अशा ट्रेलरमधून एक मुलगा बेपत्ता झाल्याचे दिसत असून त्याचे आई - बाबा त्याला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता हा मुलगा खरोखरच बेपत्ता झाला आहे की,

तो त्याच्या आई - बाबांवर रूसून निघून गेला आहे? हा बेपत्ता मुलगा नक्की कुठे आहे? अवघड वाटेवर त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आणि हा प्रवास त्याला कुठे घेऊन जाणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना जर्नी सिनेमा पाहून मिळतील.

जर्नी सिनेमाची स्टारकास्ट

सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित 'जर्नी' चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, निखिल राठोड अशा कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहेत.

सचिन दाभाडे यांची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला हे ‘जर्नी’ चे सहनिर्माते आहेत.

काय आहे जर्नी सिनेमाची रिलीज डेट

जर्नी सिनेमाचे दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, " 'जर्नी' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आयुष्याशी, नात्यांशी आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष यानिमित्ताने उलगडणार आहे. ही ‘जर्नी’ प्रेक्षकांना बरंच काही देणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी मागे सुटत आहेत आणि त्याच पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न ‘जर्नी’मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत हा चित्रपट आवर्जून पाहावा.’’

अशाप्रकारे रहस्यमय कथा असलेला जर्नी सिनेमा १३ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

आता पुर्णा आजीची जागा कोण घेणार? 'ठरलं तर मग'बद्दल बोलताना निर्मात्या सुचित्रा बांदेकर म्हणाल्या...'त्यांना जेव्हा अ‍ॅडमिट...'

SCROLL FOR NEXT