Jr NTR On Oscars' Academy List Of New Member Class Of Actors proud moment of indians rrr SAKAL
मनोरंजन

Jr. NTR: भारतीयांसाठी अभिमान! RRR ने ऑस्कर गाजवल्यानंतर ज्यूनियर एनटीआरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ज्यूनियर एनटीआरने ऑस्कर अकादमीत पुन्हा एकदा सन्मानजनक कामगिरी केलीय

Devendra Jadhav

बुधवारी रात्री समस्त भारतीयांना एक आनंदाची बातमी मिळाली. ऑस्कर अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या कलाकार यादीत ज्यूनियर एनटीआरचा समावेश झालाय.

यंदा RRR सिनेमाने ऑस्कर गाजवला हे आपल्या सर्वांना माहितच आहे. आता याच ऑस्करच्या सदस्यांमध्ये ज्युनियर एनटीआरचा समावेश झालाय.

(Jr NTR On Oscars' Academy List Of New Member Class Of Actors)

बुधवारी रात्री ऑस्कर पुरस्कारांच्या ऑफीशियल पेजने ही घोषणा केली. ऑस्कर पुरस्काराच्या ऑफीशीयल पेजने निवेदन दिले की, या समर्पित आणि प्रतिभाशाली कलाकारांच्या सक्षम हातात, कथा कल्पनाशक्तीच्या मर्यादेच्या पलीकडे जातात.

एक मूर्त, दृश्यमान अस्तित्व धारण करतात जे जगभरातील दर्शकांना मोहित करतात. त्यांच्या सूक्ष्म अभिव्यक्ती, आकर्षक हावभाव आणि अस्सल चित्रण यांच्याद्वारे, ते काल्पनिक आणि वास्तविकता यांच्यातील अंतर कमी करतात. ज्यामुळे आणलेल्या पात्रांचा संघर्ष, आनंद आणि विजयांमध्ये आम्हाला स्वतःला डोकावण्याची संधी मिळते.

अशी पोस्ट करत ज्यूनियर एनटीआरचा ऑस्कर सदस्यांमध्ये समावेश झालाय. ज्युनियर एनटीआर शिवाय के हुए क्वान, मार्शा स्टेफनी ब्लेक, केरी कॉन्डोन, एन.टी. अशा दिग्गज आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सुद्धा ऑस्करमध्ये सहभाग झालाय.

दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं, ज्युनियर एनटीआर लवकरच अॅक्शन-पॅक एंटरटेनर 'देवरा' मध्ये दिसणार आहे. कोरटाला सिवा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांसारखे बॉलिवूड स्टार्स देखील आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ५ एप्रिल रोजी तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हृतिक रोशनच्या वॉर सिनेमात ज्युनियर एनटीआर दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT