juhi chawala 
मनोरंजन

एअरपोर्टवर जुही चावलाची हरवली 'ही' महागडी वस्तु, शोधून देणा-याला मिळणार बक्षीस

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- सेलिब्रिटींचं कोणतं ट्विट कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. असंच काहीसं झालंय ते अभिनेत्री जुही चावलाच्या बाबतीत. अभिनेत्री जुही चावलाने रविवारी ट्विट करुन सांगितलं आहे की तिच्या कानातला झुमका मुंबई एअरपोर्टवर पडला आहे. तिचा हा झुमका हरवल्याने ती हैराण झाली आहे. जुहीने ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे.  

जुहीने ट्विट करत या घटनेविषयी सविस्तर सांगितलं आहे. तिने इथपर्यंत म्हटलं आहे की जो तिचा हा कानातला झुमका शोधून देईल त्याला ती बक्षीस देण्यासाठी देखील तयार आहे. जुहीचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे. या व्हायरल ट्विटमध्ये जूहीने सांगितलं आहे की सकाळी मी मुंबई एअरपोर्टच्या गेट नंबर ८ कडे जात होती. एमिरेट्स काऊंटरवर मी चेक इन केलं. सिक्युरिटी चेक झालं. मात्र यामध्येच कुठेतरी माझा डायमंड झुमका पडला आहे.

जुहीने पुढे म्हटलंय की जर कोणी माझी मदत करु शकलं तर मला खूप आनंद होईल. तुम्ही पोलिसांना माहिती द्या. मी तुम्हाला बक्षीस देईन. हा झुमका माझा मॅचिंग पीस आहे जो मी १५ वर्षांपासून सतत घालत आहे. कृपया मला हे शोधण्यासाठी मदत करा. या लांबलचक पोस्टसोबत जुहीने त्या डायमंड झुमक्याचा फोटो देखील शेअर केला आहे. तिने तिच्या एका हातात झुमका पकडला आहे. तिला आशा आहे की कोणी ना कोणी तिला हा तिचा महागडा झुमका आणुन देईल.

अभिनेत्री जुही चावला सध्या लाईमलाईटपासून लांब असली तरी तिच्या या झुमक्याने मात्र ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा झुमका एअरपोर्टवर हरवला आहे मात्र बरोब्बर एक महिना आधी याच मुंबई एअरपोर्टच्या अधिका-यांवर खराब व्यवस्थेमुळे तिने ट्विट करत राग व्यक्त केला होता.   

juhi chawla diamond earring lost at airport tweet going viral will get reward  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT