jui gadkari reply to fans who comment on her photo tharla tar mag SAKAL
मनोरंजन

Jui Gadkari: "फोटोमध्ये खाली का बसलीय?" चाहत्याने प्रश्न विचारताच जुई गडकरीने दिलं चोख उत्तर

जुईच्या एका फोटोवर चाहत्याने केलेली कमेंट व्हायरल झालीय

Devendra Jadhav

Jui Gadkari News: जुई गडकरी ही मराछी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. जुईला आपण याआधी अनेक मालिका, सिनेमांमध्ये पाहिलंय. जूई गडकरीने सध्या ठरलं तर मग मालिकेत अभिनय करतेय.

जुई सोशल मिडीयावर विविध फोटो पोस्ट करत असते. या फोटोंवर जुईचे चाहते विविध कमेंट्स करत असतात. जुईच्या एका फॅनने तिच्या फोटोवर अशीच एक कमेंट केली आहे. त्यावर जुईने केलेला रिप्लाय सुद्धा व्हायरल झालाय.

(jui gadkari reply to viral fans who comment on her photo)

जूईचा फोटो नेमका काय?

जुईने काही तासांपूर्वी एक फोटो शेअर केलाय. या फोटोत जुईने लाल रंगाच्या साडीत जमिनीवर बसून फोटोशूट केलंय. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

जुईने केलेल्या या फोटोशूटवर तिच्या फॅन्सनी अनेक भारी भारी कमेंट्स केल्या आहेत. अशातच एका फॅनने केलेली कमेंट आणि त्यावर जुईने केलेला रिप्लाय चर्चेत आलाय

फोटोवर चाहत्याची कमेंट आणि त्यावर जूईचा रिप्लाय

जुईच्या या फोटोवर तिच्या चाहत्याची कमेंट व्हायरल झालीय. जुईच्या एका चाहत्याने म्हटलंय की, फोटो छान आहे पण खाली का बसलीय? जुईने या कमेंटची दखल घेतली आणि म्हणाली, "माणसाने नेहमी जमिनीवरच राहावं."

जुईने दिलेला हा रिप्लाय तिच्या फॅनला चांगलाच आवडला. तो पुढे म्हणाला, " yeah in life, not literally. पण आवडला तुमचा हजरजबाबीपणा. बाकी काही नाही तुमची इतकी सुंदर साडी खराब होईल म्हणून म्हटलं."

जुईची मालिका TRP मध्ये अव्वल

जूई सध्या स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत अभिनय करत आहे. जूईची ही नव्याने सुरु झालेली मालिका TRP मध्ये टॉपला असते.

या मालिकेत जूई सोबक अमित भानूशाली, ज्योती चांदेकर, सचिन गोखले असे कलाकार बघायला मिळतात. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT