jui gadkari revealed her wedding date in real life tharla tar mag marathi serial SAKAL
मनोरंजन

Jui Gadkari: ठरलं तर मग! जुई गडकरी खऱ्या आयुष्यात या तारखेला करणार लग्न, केला खुलासा

जुई गडकरी या तारखेला लग्न करणार असल्याचा खुलासा तिने केलाय

Devendra Jadhav

Jui Gadkari News: जुई गडकरी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेत सायलीची भुमिका साकारतेय. ठरलं तर मग मालिका सध्या TRP च्या शिखरावर आहे.

अशातच ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी खऱ्या आयुष्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

(jui gadkari revealed her wedding date)

या तारखेला जुई गडकरी करणार लग्न

ठरलं तर मग मधील अर्जुन - सायली म्हणजेतच अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली या दोघांनी हंच मिडीया या वेबपोर्टलला मुलाखत दिली. त्यावेळी संवाद साधताना जुईने थेट तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली.

जुईच्या गडकरी पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ ला लग्न करणार आहेत. जुई गडकरी ४ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचा खुलासा तिने केलाय.

जुई गडकरीने स्वतःहून लग्नाची तारीख जाहीर केल्याने तिच्या फॅन्सना सुखद धक्का बसलाय. जुईच्या म्हणण्याप्रमाणे तिचा यंदाचा व्हॅलेंटाईन डे चांगला होणार आणि आयुष्याला नवी सुरुवात करणार.

जुई गडकरी नेमकं कोणाशी लग्न करणार, तिचा होणारा नवरा काय करतो हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. जुईला लग्नानंतर नवऱ्याला आणि संसाराला वेळ द्यायचाय असं तिचं म्हणणं आहे. जुईच्या लग्नाची तिच्या फॅन्सना आतापासुनच उत्सुकता आहे.

जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असुन तिने आजवर पुढचं पाऊल, वर्तुळ अशा मराठी मालिकांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय जुई बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होती.

सध्या जुईची ठरलं तर मग मालिका लोकप्रिय झाली आहे. जुई गडकरी मालिकेत साकारत असलेली सायलीची भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेमुळे जुईच्या फॅन फॉलोईंगमध्येही वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT