jui gadkari facebook
मनोरंजन

'अलका कुबल बनून राहशील तर कोणी ढुंकून पाहणार नाही'; ट्रोलर्सना जुईचं सडेतोड उत्तर

नेटकऱ्यांचा जुईला अजब सल्ला

स्वाती वेमूल

सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा फटका सेलिब्रिटींना सर्वाधिक बसत असतो. एखाद्या फोटोशूटवरून, वक्तव्यावरून किंवा मग दिसण्यावरून अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री जुई गडकरीला Jui Gadkari अशाच घटनेला सामोरं जावं लागलं. जुईने सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोंवर काही नेटकऱ्यांनी केलेले कमेंट्स पाहून जुई संतापली. 'असेही अनुभव.. मी जे ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केले, त्यावर माझ्या फेसबुक पेजला आलेले हे कमेंट्स', असं सांगत जुईने हे कमेंट्स आणि त्यावर तिने दिलेले उत्तर पोस्ट केले आहेत. (jui gadkari slams trollers who trolled for her recent black and white photoshoot)

'सोशल मीडियावर जर तुला स्थिरस्थावर व्हायचे असेल तर वादविवाद करणे आवश्यक आहे. अलका कुबल बनून राहशील तर तुझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. बघ प्रयत्न करून. मला अलकाजींवर टीका करायची नाही, पण इतका ताणलेला नम्र, सोज्वळ स्वभाव इकडे चालत नाही. या प्लॅटफॉर्मवर कसं सगळं हॉट पाहिजे असतं', असा अजब सल्ला एका नेटकऱ्याने जुईला दिला. त्यावर जुईने नेटकऱ्याला उत्तर दिलं, 'तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. पण मला हॉटनेसमध्ये रस नाही आणि ज्यांना मी आवडते ते माझ्याकडे नक्की बघतील. असो तुम्हाला शुभेच्छा.'

जुईच्या फोटोंवर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत तिला कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहण्याचा सल्ला दिला. 'मला तुझा अपमान करायचा नाही, पण जर तू सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलंस तर तुला कळेल की इथे प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रोव्हर्सी आहे. तुला जर रातोरात प्रसिद्धी हवी असेल तर मीडिया कॅमेरा घेऊन बसलीच आहे. प्रकाशझोतात राहायचं असेल तर कॉन्ट्रोव्हर्सी खूप महत्त्वाची आहे', अशी कमेंट त्या नेटकऱ्याने केली. जुईने या नेटकऱ्यालाही तिच्याच अंदाजात उत्तर दिलं. 'गेल्या दहा वर्षांपासून मला फक्त माझ्या कामाने प्रसिद्धी मिळवून दिली. रातोरात प्रसिद्धी मिळवण्यात माझा विश्वास नाही आणि हो, हा काही रिअॅलिटी शो नाही, जिथे तुम्ही बाद होऊ शकता. हे माझं आयुष्य आहे आणि ते मी माझ्या मूल्यांवरच जगेन', असं जुई म्हणाली.

जुईने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे', 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जुईने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातही भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT