kaalapani teaser amey wagh ashutosh govarikar mona singh SAKAL
मनोरंजन

KaalaPaani Teaser: अमेय वाघ, आशुतोष गोवारीकरची नवी हिंदी वेबसिरीज, काला पानी ची पहिली झलक बघा

अमेय वाघची हिंदी वेबसिरीज काला पानी चा टीझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

KaalaPaani Teaser: अमेय वाघची असूर ही वेबसिरीज प्रचंड गाजली. काहीच दिवसांपूर्वी या वेबसिरीजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिझनला सुद्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता असुर नंतर अमेय वाघची आणखी एक हिंदी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचं नाव काला पानी. नुकतंच या वेबसिरीजची पहिली झलक सर्वांसमोर आलीय.

(kaalapani teaser amey wagh ashutosh govarikar mona singh)

वेबसिरीजची पहिली झलक

एका जंगलात एक माणूस धावत असतो. अशातच अमेय वाघची पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत एन्ट्री होते. पुढे एक आदीवासी धनुष्यबाण रोखून धरताना दिसतो. नंतर बाहेरून एक तुरुंग दिसतो. आशुतोष गोवारीकर आणि मोना सिंग यांचीही झलक पाहायला मिळते. विषय जरी कळत नसला तरीही ही वेबसिरीज सस्पेस्न थ्रिलर असणार यात शंका नाही.

मराठी कलाकारांची काला पानी वेबसिरीजमध्ये फौज

काला पानी वेबसिरीजचा टिझर आऊट झाल्यापासून त्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर मराठी कलाकारांची फौज या सिरीजमध्ये पाहायला मिळतेय. अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहे शिवाय अभिनेता - दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सुद्धा या वेबसिरीजमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सुद्धा

काला पानी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. एकूणच असूर गाजवल्यानंतर अमेय वाघच्या या नव्या वेबसिरीजची सर्वांना उत्सुकता आहे.

कधी आणि कुठे बघायला मिळणार काला पानी?

काला पानी ही वेब सिरीज 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ott प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज पाहायला मिळणार आहे. समीर सक्सेना आणि अमित गोलानी या दोघांनी मिळून या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलंय. बिस्वपती सरकारने ही वेबसिरीज लिहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT