Kaali poster Controversy: Swara Bhasker supports TMC MP Mahua Moitra over her 'meat-eating' goddess remark
Kaali poster Controversy: Swara Bhasker supports TMC MP Mahua Moitra over her 'meat-eating' goddess remark Google
मनोरंजन

'काली' पोस्टर वादात स्वरा भास्करची उडी,महुआ मोइत्रांचे समर्थन करत म्हणाली...

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर(Swara Bhaskar) आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे अनेकदा ती वादातही ओढली जाते. आता तिनं 'काली'(KAALI) सिनेमाच्या पोस्टरवरुन सुरु असलेल्या वादात(Controversy) उडी मारली आहे. या वादग्रस्त प्रकरणात तृणमुल कॉंग्रेसच्या महुआ मोइत्रा यांनी 'काली' सिनेमाच्या पोस्टरला पाठिंबा दिला होता. आता स्वरानं महुआ मोइत्रा यांचे समर्थन केले आहे. आणि त्यामुळे पुन्हा स्वरावर ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे. अभिनेत्रीनं ट्वीट करत दांभिक हिंदू धर्मियांना मोफत सल्ला देखील दिला आहे. स्वरानं म्हटलं आहे की,''हिंदू धर्मात विविधता पहायला मिळते. आणि असं असताना जर तुम्ही हिंदू धर्माच्या विविध परंपरा-पद्धतींना जर मानत नसाल तर तो त्या धर्माचा अपमान आहे''.(Swara Bhasker speaks on kali Poster Controversy,support Mahua Moitra)

स्वरा भास्करने महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांच्या समर्थनार्थ केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की,''महुआ मोइत्रा तुम्ही कमाल आहात. तुमच्या आवाजाला भक्कम पाठिंबा मिळो''. स्वराचे हे ट्वीट महुआ मोइत्रा यांच्या त्या प्रतिक्रियेनंतर आलं आहे ज्यामध्ये महुआ मोइत्रा यांनी वादग्रस्त 'काली' सिनेमाच्या पोस्टरचं समर्थन केलं होतं. भारतीय वंशाची कनेडियन फिल्ममेकर लीना मणिमेकलाईच्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरवरुन मोठा वाद ओढवला आहे. पोस्टरवर 'काली' च्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीच्या हातात सिगारेट दाखवली आहे,आणि चक्क ती धुम्रपानही करताना दाखवली गेलीय. तसंच तिच्या हातात LGBTQ चा झेंडा देखील आहे.

स्वरानं या प्रकरणावर बुधवारी म्हणजे आज ६ जून,२०२२ रोजी ट्वीट केलं आहे. तिनं आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''प्रिय,हिंदू दक्षिण पंथीयांनो आणि दुसरे त्यांना घाबरुन शांत बसलेले हिंदू दक्षिण पंथीय,जर तुम्ही हिंदू धर्मातील विविधतेला समजत नसाल,जर या धर्मातील वेगवेगळ्या परंपरा,संस्कृती याचा तुम्ही स्विकार करत नसाल तर तो तुम्ही एकप्रकारे हिंदू धर्माचा केलेला अपमानच आहे नाही का?''

स्वरा भास्करला तिच्या या ट्वीटमुळे खूप ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की,'स्वरा ज्याप्रकारे हिंदू धर्माच्या लोकांना नको ते सल्ले देते,कधी इतर धर्मीयांना असे सल्ले देताना दिसत नाही'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'स्वराला नको तिथे उगाच बोलायची सवय आहे,तिचं म्हणणं फार गंभीरतेने घेऊ नका'.

माहितीसाठी इथे नमूद करतो की,तृणमूल कॉंग्रेसच्या महुआ मोईत्रा यांना एके ठिकाणी 'काली' पोस्टर वादावर प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,''माझ्यासाठी काली मां देवी आहे,जी मांस खाते,मद्यप्राशन करते. जर तुम्ही तारापीठला गेलात तर तिथे साधू देखील तुम्हाला धुम्रपान करताना दिसतील. लोक कालीच्या या रुपाला पुजतात. मी स्वतः काली मां ची पुजा-अर्चना करते. तेव्हा काली मां च्या रुपाला माझ्या कल्पनेप्रमाणे अनुभवण्याचा माझा अधिकार आहे. हे माझं स्वातंत्र्य आहे''. महुआ यांच्या याच वक्तव्यावरनं वाद पेटला. अर्थात हा वाद उठल्यानंतर महुआ यांनी स्पष्टिकरण देताना मी माझं म्हणणं फक्त मांडलं होतं,कोणत्याही सिनेमाचं समर्थन केलेलं नाही अशी सारवासारव केली आहे.

दुसरीकडे 'काली' पोस्टरचा वाद काही थांबताना दिसत नाही. फिल्ममेकर लीना मणिमेकलाईनं यासाठी माफी मागितलेली आहे. परंतु भारतात तिच्या विरोधात उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये एफआयआर दाखल केली गेली आहे. याच प्रकरणात कॅनडाच्या त्या म्युझियमने देखील माफी मागितली आहे,जिथे 'काली' सिनेमाच्या पोस्टरला सर्वप्रथम रिलीज केलं गेलं होतं. यादरम्यान मोदी सरकारच्या सांगण्यावर ट्वीटरने लीना मणिमेकलाईच्या त्या ट्वीटला देखील ब्लॉक केलं आहे,ज्यामध्ये तिनं सोशल मीडियावर 'काली' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT