kaand marathi webseries writen by marathi actress manava naik produced by planet marathi  SAKAL
मनोरंजन

Kaand Webseries: एका भयाण महाजालात अडकणाऱ्या लोकांचं 'कांड', नवीन वेबसिरीज भेटीला, ही अभिनेत्री लेखिका

एका नवीन वेबसिरीजची घोषणा झालीय. वेबसिरीजचं नाव आहे कांड

Devendra Jadhav

Kaand Web Series: मराठी मनोरंजन विश्वात निरनिराळ्या विषयांवर आधारीत अनेक सिनेमे, वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मराठी मनोरंजन विश्वात अशीच एक नवीन विषय असणारी वेबसिरीज भेटीला येत आहे. तिचं नाव कांड.

कांड वेबसिरीजचं पोस्टर आज भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेता या वेबसिरीजचं दिग्दर्शन करत आहेत.

(kaand marathi webseries news)

काय आहे कांडचा विषय?

कांड निमित्ताने एक महत्वाचा विषय मांडण्यात येणार आहे. हा विषय म्हणजे सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर शारीरिक आकर्षणासंबंधी व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात.

परंतु समाजाच्या भीतीपोटी,शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेक जण योग्य पाऊल उचलत नाहीत. आणि होत्याचं नव्हतं होतं. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. (Latest Marathi News)

मराठी मनोरंजन विश्वातील हा अभिनेता - अभिनेत्री कांडचे लेखक

भिमराव काशिनाथ मुडे दिग्दर्शित ‘कांड’ या वेबसीरिजचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच झळकले आहे.

विशेष गोष्ट अभिनेत्री मनवा नाईक आणि अभिनेता हरीश दुधाडे याशिवाय भिमराव काशिनाथ मुडे यांनी या सीरिजचे लेखन केले आहे. प्लॅनेट मराठी आणि मॅन्यूएला क्रिएशन्स निर्मित या वेबसीरिजचे अक्षय विलास बर्दापूरकर आणि मनवा नाईक निर्माते आहेत. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती कांड वेबसिरीजमध्ये कोणते चेहरे झळकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT