kader khan 
मनोरंजन

'जपून ठेवलेली बक्षिसाची ती नोट अखेर गरिबीमुळे करावी लागली खर्च'

अश्रफ खान यांनी कादर खान यांना स्मशानभूमीत उभं राहून अभिनय करताना पाहिलं होतं.

स्वाती वेमूल

अश्रफ खान यांनी कादर खान यांना स्मशानभूमीत उभं राहून अभिनय करताना पाहिलं होतं.

विनोदवीर, दिग्दर्शक आणि संवाद लेखक म्हणून एक काळ गाजविणारे अभिनेते कादर खान यांचा बॉलिवूडमधील प्रवास काही सोपा नव्हता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मेहनतीने त्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. एकेदिवशी त्यांचं दमदार अभिनय पाहून एका वृद्धाने त्यांना १०० रुपये बक्षीस म्हणून दिलं होतं. आपल्या कामाची पोचपावती म्हणून कादर खान यांनी ती नोट कित्येक वर्षे जपून ठेवली होती. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अखेर त्यांना एकेदिवशी ही नोट अखेर खर्च करावी लागली होती.

वयाच्या आठव्या- नवव्या वर्षी कादर खान यांनी एका नाटकात काम केलं होतं. ते नाटक पाहायला आलेले एक वृद्ध कादर खान यांच्या अभिनयाने प्रभावित झाले होते. त्या ज्येष्ठ व्यक्तीने कादर खान यांची पाठ थोपटत त्यांना १०० रुपये बक्षीस म्हणून दिलं होतं. कादर खान यांना पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम भेट म्हणून मिळाली होती. ते खूप खुश झाले होते. अनेक वर्षे जपून ठेवलेली ही नोट त्यांना अखेर एकेदिवशी घरच्या परिस्थितीमुळे खर्च करावी लागली होती. खायला अन्नाचा कण नसताना त्यांनी किराणा माल भरण्यासाठी ती १०० रुपयांची नोट त्यांच्या कामी आली होती.

अश्रफ खान यांनी दिली पहिली संधी

अभिनेते अश्रफ खान यांनी कादर खान यांना स्मशानभूमीत उभं राहून अभिनय करताना पाहिलं होतं. त्यांनीच कादर खान यांना अभिनयाची पहिली संधी दिली होती. त्यांच्या 'जूनुन' या नाटकात कादर खान यांनी राजकुमाराची भूमिका साकारली होती. अश्रफ खान यांच्यामुळे गरीब कुटुंबात राहणारा मी राजकुमारची भूमिका करू शकलो, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

कादर खान यांचा जन्म काबूलमध्ये झाला होता. त्यांच्या जन्माच्याआधी अत्यंत कमी वयात त्यांच्या तीन भावंडांचं निधन झालं होतं. त्यामुळे कादर खान यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई फार चिंतेत होती. मुलांसाठी ही जागा ठीक नाही असा विचार करत त्यावेळी त्यांनी भारतात यायचा निर्णय घेतला होता. भारतात आले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कामाठीपुरामध्ये एका चाळीत ते राहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT