rishi saksena
rishi saksena 
मनोरंजन

'गुडबॉय' ऋषीला मिळेल का त्याची ड्रीम गर्ल? 

सकाळ ऑनलाइन

मराठी मालिका 'काहे दिया परदेस'मधून अभिनेता ऋषी सक्सेनाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. ऋषीची 'गुडबॉय' ही मराठी वेब सीरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाली. ही वेब सीरीज हंगामा प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'गुडबॉय' या वेब सीरिजची निर्मिती कॅफे मराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली आहे. या वेब सीरिजमध्ये ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, विनय येडेकर, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी, अभ्यंग कुवळेकर, रीना अगरवाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. बद्रिश पाटील यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. अक्षय राणे यांनी छायांकन केले आहे.

कॉलेजमध्ये असल्यापासून खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या तरूणाचा अनुभव या वेब सीरिजमध्ये दाखवला आहे. वेब सीरिजमध्ये दाखवले आहे की, या तरूणाबद्दल मुलींमध्ये वेगळाच समज निर्माण होतो. यामुळे त्या तरूणाच्या अडचणी वाढतात. त्या अडचणींमधून तो कसा बाहेर पडतो हे या वेब सीरिजमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या वेब सीरिजमध्ये ऋषीचा रोमँटिक अंदाज पहायला मिळणार आहे. हंगामा प्ले सोबतच 'मी टीव्ही’वरही ही वेब सीरीज प्रेक्षक पाहू शकतात. या वेब सीरीजचा ट्रेलर १ मार्चला प्रदर्शित झाला. मराठी सोबतच हिंदी ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT