kailas nath malyalam actor passed away at the age of 65  SAKAL
मनोरंजन

Kailas Nath Death: लोकप्रिय अभिनेता कैलास नाथ यांचं निधन, वयाच्या ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कैलास नाथ यांच्या निधनाची बातमी वाचून त्याचे चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत.

Devendra Jadhav

Kailas Nath Passed Away News: लोकप्रिय टीव्ही आणि चित्रपट अभिनेते कैलास नाथ यांचं निधन झालंय. कैलास नाथ हे काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी कोची येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मल्याळम मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

(kailas nath malyalam actor passed away at the age of 65)

कैलास नाथ हे गेल्या काही दिवसांपासुन सतत आजारी होते. आजारपणामुळे काही दिवसांपासून सतत हॉस्पिटलमध्ये ये-जा करत होते. पण त्यांची तब्येत सुधारली नाही आणि 3 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कैलास नाथ यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

'द न्यूज मिनिट' च्या वृत्तानुसार, मल्याळम अभिनेता कैलास नाथ यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून नॉन-अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसवर उपचार सुरू होते.

अभिनेता सीमाजी नायर यांनीही त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या निधनावर त्यांच्या सहकलाकारांनी शोक व्यक्त केला.

कैलास नाथ हे छोट्या पडद्यावर अधिक लोकप्रिय होते. त्यांनी अनेक मालिकांमध्ये अभिनय केलाय. परंतु त्यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये अनेक सहाय्यक भूमिका केल्या. कैलास नाथ यांनी आपल्या करिअरची सुरुवात मिमिक्री अॅक्टर म्हणून केली होती.

त्यानंतर 1977 मध्ये 'विदारुन्ना मोट्टुकल' या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. टीव्हीवर त्यांनी 'सथवनम', 'मलूथी', 'रथ्रिकल', 'पूरप्पाडू' आणि 'प्रणवम' अशा शोमध्ये काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT