Kajal Aggarwal
Kajal Aggarwal  
मनोरंजन

काजल अगरवालने केला आजाराचा खुलासा; चाहत्यांना केली विनंती

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री काजल अगरवाल हिने सोशल मीडियावर स्वत:विषयी एक खुलासा केला. वयाच्या पाचव्या वर्षापासून अस्थमा असल्याचं तिने या पोस्टद्वारे सांगितलं. त्याचप्रमाणे चाहत्यांना एक विनंतीसुद्धा केली. 

काय आहे काजलची पोस्ट?
'वयाच्या पाचव्या वर्षी, मला ब्रॉन्किअल अस्थमा असल्याचं निदान झालं. यामुळे सर्वांत आधी माझ्या खाण्यापिण्यावर बंधनं आली. मी दुग्धजन्य पदार्थ आणि चॉकलेट खाऊ शकत नव्हती. मोठी झाल्यानंतरही फार काही बदल झाले नाही. प्रत्येक वेळी प्रवास करताना, हिवाळ्यात किंवा धूळ आणि धूराच्या संपर्कात आल्यावर अस्थमाची लक्षणं आणखी वाढायची. यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग मला इनहेलर्सद्वारे मिळाला. मी इनहेलर्स वापरायला सुरुवात केली आणि लगेच फरक जाणवू लागला.'

या पोस्टच्या माध्यमातून काजलने इनहेलर्सविषयी जनजागृती केली. 'आता मी बाहेर जाताना इनहेलर्स आवर्जून सोबत घेते. माझ्या हातात इनहेलर्स पाहून अनेकांना प्रश्न पडतो. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे इतरांचा विचार करून इनहेलर्स वापरत नाही. पण इनहेलर्स वापरताना कोणतीही लाज बाळगण्याची गरज नाही. मी माझ्या मित्रमैत्रिणींना, फॉलोअर्सना विनंती करते की त्यांनीसुद्धा अस्थमा आणि इनहेलर्सच्या वापराविषयी जनजागृती करावी आणि सकारात्मकता पसरवावी', असं ती म्हणाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT