मनोरंजन

Kajol Kiss: 29 वर्षांनंतर मोडला काजोलनं नो-किसिंग पॉलिसी रेकॉर्ड!

Vaishali Patil

The Trial Kajol Kiss: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर चालत नाही आहे. काही ठराविक चित्रपट सोडले तर बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत.

तर दुसरीकडे ओटीटीवरील वेब सिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता बऱ्याच मोठ मोठ्या कलाकरांनी ओटीटीवर पदार्पण केलं आहे.

त्यातच सध्या काजोल देखील ओटीटीकडे वळाली आहे. काजोल नुकतिच लस्ट स्टोरीजमध्ये दिसली होती. तिच्या या सिरिजमधल्या स्टोरीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर आता काजोलने ओटीटीवर 'द ट्रायल' या वेब सीरिजमधून डेब्यू केला आहे. काजोलचा द ट्रायल हा एक कोर्ट रुम ड्रामा आहे.

मात्र काजोलची ही सिरिज चर्चेत आली ती तिच्या किसिंग सीनमुळे. होय, काजोलने या शोमध्ये त्याने पहिल्यांदाच ऑनस्क्रिन किस केले आहे.

यापूर्वी तिने अनेक सिनेमांना ऑनस्क्रीन किस करणं टाळालं आहे. या सिरिजमध्ये काजोलने अभिनेता अली खानला किस केले आहे.

'द ट्रायल' शोसाठी 48 वर्षीय काजोलने तिची नो किसिंग पॉलिसी मोडल्याने सोशल मिडियावर सर्वत्र फक्त याचीच चर्चा रंगली आहे.

काजोलने शोच्या दोन वेगवेगळ्या एपिसोडमध्ये तिचे अभिनेते अली खान आणि जिशू सेनगुप्ता यांना किस केलं आहे. सध्या काजोलच्या लिप-लॉक आणि इंटिमेट सीन्स सोशल मीडियावर चर्चा आहे.

त्यातच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काजोलने सांगितलं की लोक काय विचार करतात याबद्दल याचा तिला काही फरक पडत नाही.

या मुलाखतीत तिने सांगितलं की , कशाप्रकारे तिच्या आईने दिलेल्या संस्कारामुळे ती एक मजबूत व्यक्ती बनली आहे.

ती म्हणते की, "मी माझ्या आयुष्यात 'लोग क्या कहेंगे'कडे कधीच लक्ष दिले नाही. माझा सांभाळ एका कणखर आईने केले. माझ्या आईला समाजाची मुळीच पर्वा नव्हती. माझ्या आईचं कुटुंब खूप मजबूत होतं. माझ्या पणजीपासून सगळेच माझी आजी, माझी आई यांनी चांगलं कसं वागायचे हे मला उदाहरणाद्वारे शिकवलं आहे. तुमचं जीवन ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यावर इतर कोणाचं मत महत्त्वाचे नाही "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात उष्णतेचा इशारा 16 ते 18 एप्रिलदरम्यान येलो अलर्ट

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT