kamaal r khan,arjun kapoor, malaika arora file image
मनोरंजन

अर्जुन-मलायकाचा 'तो' फोटो शेअर करत 'KKR' ने लगावला सलमानला टोला

मलायकाने अर्जुनसोबतचा एक खास फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रियांका कुलकर्णी

मलायकाने अर्जुनसोबतचा एक खास फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरचा काल (शनिवारी) 36 वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलिवूड कलाकरांनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या पण सर्वांचे लक्ष वेधले ते अभिनेत्री मलायका आरोराच्या पोस्टवर. मलायकाने अर्जुनसोबतचा एक खास फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या रोमॅंटिक फोटोला मलायकाने 'माझ्या सनशाइनला वाढदिवसाच्या शुभेच्छा' असे कॅप्शन दिले. या फोटोमध्ये मलायका आणि अर्जुन दोघेजण वर्कआउटच्या आउफिटमध्ये दिसत आहेत. दोघांचा हा फोटो ट्विट करत कमाल राशिद खानने (kamaal r khan) सलमान खानला टोमणे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.(kamaal r khan share photo of arjun kapoor and malaika arora)

कमालने मलायका आणि अर्जुनचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'भावा अर्जुन कपूर तू टायगर आहेस, तुझ्यात हिंमत आहे. नाकावर टिच्चून तु मिळवले. तुला सलाम.' केआरकेच्या या कॅप्शनमुळे त्याने खान कुटुंबाला टोला लगावला आहे. तसेच सलमानच्या चित्रपटातील 'टायगर' या भूमिकेचे नाव घेत अर्जुनचे कौतुक केले. हे नेटकऱ्यांच्या लक्षात आले. नंतर सारवासारव करत त्याने पोस्ट केली, 'अरे तुम्ही नेहमी चुकीचा अर्थ का काढता? मी तर 'एक व्हिलन' हा सिनेमा सिद्धार्थ मल्होत्राकडून हिसकावून घेतल्याबद्दल बोलतोय, आणखी काहीही नाही.'

'KKR'-सलमान वाद

कमाल राशिद खान आणि सलमान खान यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सलमानच्या राधे चित्रपटाचा रिव्ह्यु त्यानं केला होता. त्यावेळी त्या चित्रपटासंबंधी त्यानं काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे भडकलेल्या सलमानने कोर्टात धाव घेतली होती.

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या अफेअरची चर्चा सुरू होती. मलायका आणि अर्जुनने 2019 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अर्जुन अनेक वेळा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतो. मलायकाचे वय 47 आहे. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा त्यांना ट्रोल केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

SCROLL FOR NEXT