Kamal Haasan On The Kerala Story : Esakal
मनोरंजन

Kamal Haasan On The Kerala Story: 'असे प्रोपगंडा असलेले सिनेमे..', 'द केरळ स्टोरी' बद्दल कमल हसनचे धक्कादायक विधान..'

Vaishali Patil

Kamal Haasan On The Kerala Story: सध्या मनोरंजन विश्वात चर्चा असलेल्या सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा गाठला आहे. अजूनही या चित्रपाटाची कमाई सुरु आहे. या चित्रपटाबाबत नेहमीच दोन गट तयार झालेले दिसले.

काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं तर काहींनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत विरोध केला. बंगाल आणि तामिळनाडूमध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. चित्रपटसृष्टीतूनही या चित्रपटाला वेगळा प्रतिसाद मिळाला.

त्यातच आता आयफा पुरस्कारासाठी अबू धाबीला पोहोचलेले जेष्ठ अभिनेते आणि राजकारणी कमल हसन यांनीही या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते कमल हसन हे त्याच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्याची शैली प्रत्येक वेळी त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त करण्यातांना ते म्हणाले की निर्मात्यांना चित्रपटाच्या नावाखाली 'सत्यकथा' लिहिणं आणि कोणालाही विश्वास बसवणं पुरेसं नाही.

कमल हसनने 'द केरळ स्टोरी'बद्दल म्हटले आहे की, 'मी प्रोपगंडा चित्रपटांच्या विरोधात आहे. केवळ लोगो म्हणून 'सत्यकथा' लिहिणं पुरेसं नाही. ते खरोखरच खरे असले पाहिजे आणि हा चित्रपट द केरळ कथा सत्य नाही.

'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वाद सुरू झाला. त्यात दावा करण्यात आला होता की केरळमधील 32,000 हून अधिक महिलांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं आणि त्यांना ISIS मध्ये सामिल केलं गेले. नंतर तो भाग ट्रेलरमधून काढून टाकण्यात आला आणि नंतर ती तीन महिलांची कथा म्हणून सांगण्यात आली. रिलिज झाल्यानंतरही या चित्रपटाबद्दल अनेक विवाद सुरुच आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सुपरस्टार कमल हसन त्याच्या आगामी 'इंडियन 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्याने चेन्नईमध्ये सिल्व्हर बुलेट सीनचे शूटिंग सुरू केले आहे. यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT