kamal hasan joins project k movie starring prabhas amitabh bachchan deepika padukon  SAKAL
मनोरंजन

Project K Update: ठरलं तर मग! बिग बी आणि कमल हसन एकत्र, जोडीला आदिपुरुषचा प्रभास

Project K सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आलीय.

Devendra Jadhav

Project K Movie Update News: गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुषमुळे प्रभासला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. प्रभासच्या आदिपुरुषने बॉक्स ऑफिसवर खोऱ्याने पैसे कमावले असले तरीही सिनेमावर फ्लॉपचा शिक्का बसलाय.

प्रेक्षकांना सिनेमा इतका आवडला नाही. आता प्रभासची मदार आहे त्याच्या पुढच्या सिनेमावर. हा सिनेमा म्हणजे Project K . Project K सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आलीय.

(kamal hasan joins project k movie starring prabhas amitabh bachchan deepika padukon)

Project K मल्टीस्टारर चित्रपटात आधी कमल हसनची एन्ट्री झाली आहे. तरण आदर्शने ट्विट करून त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांनीही कमल हसनचे स्वागत केले. बिग बी यांनी ट्विट करून लिहिलंय कि..

Welcome कमल, तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला आहे, खूप दिवस झाले.' कमल हसनच्या एन्ट्रीने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांच्याशिवाय दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी देखील Project K चा भाग असणार आहेत.

नाग अश्विन दिग्दर्शित Project K हा मल्टीस्टारर सिनेमा असणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असणार असल्याची माहिती या चित्रपटाच्या स्टारकास्टवरून मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, Project K मध्ये सर्वोत्तम ग्राफिक्सचा वापर केला जात आहे.

नाग अश्विन हे भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. प्रभास स्टारर या चित्रपटाचे निर्मात्यांनी जवळपास 70 टक्के शूटिंग पूर्ण केले आहे.

कमल हसनची भूमिका काय?

मीडिया रिपोर्टनुसार, कमल हसन या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. त्यांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथेला नवं वळण देईल.

अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडिओ पाहून चाहते खूप उत्साहित झाले आहेत. सायंटिफिक थ्रिलर असलेला हा सिनेमा १२ जानेवारी २०२४ ला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT