kangana commented movie mafia gang is hiding in their houses
kangana commented movie mafia gang is hiding in their houses  
मनोरंजन

कंगणा कडाडली,'चार कुटूंबे म्हणजे बॉलीवूड नव्हे,कुठे लपली मुव्ही माफिया गँग'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधल्या काही दिग्गज अभिनेत्यांवर कंगणाचा राग आहे. प्रस्थापितांविरोधात ती प्रखरपणे टीका करते. सतत आपल्या वादग्रस्त टीकेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे वादात सापडल्याचे दिसून आले आहे. ऑस्करसाठी बॉलीवूडमधील नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील जलीकट्टू या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. त्यावर कंगणाने बॉलीवूडमधल्या मुव्ही माफिया गँग्जवर टीका केली आहे.

चित्रपटाच्या क्षेत्रात सर्वात मानाचा समजल्या जाणा-या ऑस्कर पुरस्कारासाठी जलीकट्टू या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने कंगणाने सोशल मीडियावर केलेल्या व्टिटला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला आहे. फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करणार आहे. या चित्रपटाची कथा दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टू या खेळावर आधारित आहे.

कंगणा म्हणाली, यंदा ऑस्करला पाठविण्यात आलेल्या चित्रपटामुळे एक तर कळुन आले की, तथाकथित बॉलीवूडची त्यावर मक्तेदारी नाही. भारतीय चित्रपटसृष्टी ही काही त्या चार कुटूंबावर आधारलेली नाही. जलीकट्टूची निवड ऑस्करसाठी झाली आहे हे आनंददायक गोष्ट आहे. आता ती मुव्ही माफिया गँग कुठे गेली आहे, कुठे लपून बसली आहे, निवड समितीनं योग्य पध्दतीनं आपलं काम केल आहे. त्यांना व जलीकट्टूच्या टीमला धन्यवाद द्यावे लागतील. 

दरवर्षी भारतातून किमान एखादा सिनेमा त्या पुरस्कारासाठी पाठविण्यात येतो. त्यासाठी खास ऑस्कर समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र आपल्याकडे बॉलीवूड, टॉलीवूड यांच्यातील वाद जगजाहीर आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच अनेक चित्रपटांची कॉपी करणा-या बॉलीवूडमध्ये एवढे रथी महारथी असतानाही ऑस्करसाठी प्रतिक्षा करावी लागली आहे. 
जगभरातील अनेक दिग्दर्शक, निर्माते, अभिनेता या सर्वांना ऑस्कर मिळावा अशी इच्छा असते. काहींचे ते स्वप्न असते.

‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑक्टोंबर 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात Antony Varghese, Chemban Vinod Jose, Santhy Balachandran, Jaffar Idukki यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी काम केलं आहे. खिळवून ठेवणारे कथानक, पटकथा आणि अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  इतर देशांमध्ये हा चित्रपट अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजीत डब करुन प्रदर्शित झाला होता फिल्म फेडरोशन ऑफ इंडिया’नं ऑस्कर स्पर्धेसाठी या ‘जलिकट्टू’ची निवड केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT