Kangana Ranaut Bollywood actress Madhubala  esakal
मनोरंजन

Kangana Ranaut : 'मलाही सगळे मधुबालाच म्हणायचे'! कंगनाच्या 'त्या' वक्तव्यावर नेटकऱ्यांनी काढला जाळ

लीवूडची वाचाळ अभिनेत्री कंगना कधी काय बोलेल याचा भरवसा नाही. काही दिवसांपूर्वी तिनं बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर कौतूकाचा वर्षाव करुन अनेकांना धक्का दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

Kangana Ranaut Bollywood actress Madhubala : बॉलीवूडची वाचाळ अभिनेत्री कंगना कधी काय बोलेल याचा भरवसा नाही. काही दिवसांपूर्वी तिनं बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर कौतूकाचा वर्षाव करुन अनेकांना धक्का दिला होता. याचे कारण या दोन्ही सेलिब्रेटींमधील वाद कोर्टापर्यत गेला आहे. मात्र अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तो सर्जिकल स्ट्राईक केला त्याची सध्या देशभर चर्चा आहे.

कंगनाचा इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावरील चित्रपट आता प्रदर्शनासाठी तयार आहे. मात्र तो कंगनानं ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फर्स्ट लूक आला होता तेव्हा त्यावर कौतूकाचा वर्षाव झाला होता. त्यातील कंगनाच्या भूमिकेचे, तिच्या लूकचे कौतूक केले होते. कंगनाच्या चित्रपटाविषयी अनेकांना कमालीची उत्सुकता आहे. यासगळ्यात तिनं पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

कंगनानं थोड्यावेळापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर देखील टीका केली होती. आता बॉलीवूड माफियांच्या मिटींग व्हायला लागल्या. या शब्दांत कंगनानं आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर तिनं आपली तुलना आता प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली आहे. ती पोस्ट व्हायरल होताच कंगनावर सोशल मीडियातून टीका होताना दिसते आहे.

Kangana Ranaut Bollywood actress Madhubala

२३ फेब्रुवारी १९६९ मध्ये मधुबाला यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मधुबाला यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते होते. अल्पायुषी ठरलेल्या मधुबाला यांनी कमी वेळेत आपल्या अभिनयानं चाहत्यांची पसंती मिळवली होती. अशातच कंगनानं स्वताची तुलना मधुबालाशी केल्यानं नेटकऱ्यांनी तिच्यावर आगपाखड केली आहे.

कंगना आपण कोण आहोत, आपण कुणासोबत स्वताची तुलना करतो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. तू नेहमीच काहीही बोलून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. बोलण्याअगोदर एकदा विचार करण्याची गरज आहे. असेही अनेकांनी कंगनाला सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT