Kangana Ranaut Reacts On India Vs Pakistan Cricket World Cup 2023  
मनोरंजन

Ind Vs Pak Kangana Reaction : 'छेडलं तर सोडणार नाही लक्षात ठेवा', कंगनाच्या 'त्या' प्रतिक्रियेनं वेगळयाच चर्चेला सुरुवात

भारताच्या नादाला लागाल तर....कंगनाच्या त्या प्रतिक्रियेन वेगळयाच चर्चेला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Reacts On India Vs Pakistan Cricket World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ज्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते त्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतानं आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कालच्या विजयानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना पार पडल्याचे दिसून आले. त्याला लाखो चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. भारतानं पाकिस्तानचा सहजगत्या पराभव करुन चाहत्यांना वेगळी भेट दिली. तो दिवस संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी सारखाच साजरा करण्यात आला. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी देखील त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

प्रसिद्ध अभिनेत्री आणि बॉलीवूडची क्वीन अशी ओळख असणाऱ्या कंगनाच्या प्रतिक्रियेनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून कंगनाविषयी बोलले जाते. अशा या सेलिब्रेटीनं भारताच्या विजयानंतर केलेलं ते विधान चर्चेचा विषय आहे. कंगनानं दिलेली प्रतिक्रिया हा एकतर वादाचा विषय होतो किंवा वादाचा. आतापर्यत ती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

भारतानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सात विकेट्सनं पाकिस्तानवर मात केली आहे. पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताच्या बाजूनं सोशल मीडियावर कौतुकाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींनी त्यावरुन मीम्सही व्हायरल केले आहे. त्यात कंगनानं भारताची कुणी छेड काढणार असेल तर त्याची खैर नाही. तेव्हा आमच्या नादी लागू नका असा थेट शब्दांत इशाराच दिला आहे.

कंगनाचे ते ट्विट आरएसव्हिपीनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेयर केले आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाचा तेजसमधील लूक व्हायरल झाला होता. त्याला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कंगनाच्या तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावरुन नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

कंगनाच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास तिचा तेजस नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच तिचा चंद्रमुखी २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानं प्रेक्षकांची निराशा केली आहे. येत्या काळात तिचा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT