Kangana Ranaut Boyfriend? This mystery man with Kangana is raising discussion among people SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut: बॉयफ्रेंड? कंगनासोबत दिसला मिस्ट्री मॅन, लोकांच्या चर्चांना उधाण, कोण आहे तो?

कंगना एका विदेशी व्यक्तीसोबत स्पॉट होताच लोकांच्या चर्चांना उधाण आली

Devendra Jadhav

Kangana Ranaut News: कंगना रणौत सतत तिच्या विविध वक्तव्यांनी चर्चेत असते. अशातच तिने शुक्रवारी तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. कंगनाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक विदेशी व्यक्ती दिसून येतोय. काल संध्याकाळी कंगना एका सलूनमधून बाहेर पडताना मीडिया फोटोग्राफर्सना दिसली. तेव्हा तिच्यासोबत एक परदेशी व्यक्ती दिसून आला. या व्यक्तीला पाहताच लोकांच्या चर्चांना उधाण आलंय.

कंगना त्या व्यक्तीचा हात धरुन मीडियासमोर आली. ती त्याच्यासोबत खुप आनंदी आणि कम्फर्टेबल दिसत होती. कंगनाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर त्या व्यक्तीने काळा शर्ट आणि काळी जीन्स परिधान केली होती. लोकांनी तो अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे का, अशा चर्चांना सुरुवात केली. कोण आहे तो? आम्ही तुम्हाला सांगतो.

कंगना कोणासोबत दिसली?

कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फॅन्सही कमेंट करून अनेक प्रश्न विचारत आहेत. कोणी विचारत आहे की, हा कंगनाचा बॉयफ्रेंड आहे का? कंगनाच्या बॉयफ्रेंडचे नाव काय आहे? असंही कोणी विचारत आहेत

पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्यक्ती कंगनाचा बॉयफ्रेंड नाही. तो एक लोकप्रिय हेअरस्टायलिस्ट आहे, ज्याला अनेक सेलिब्रिटी फॉलो करतात. हे दोघेही एकमेकांना डेट करत नाहीत. कंगना सलूनमधून बाहेर येऊन सहज त्याचा हात धरून आली.

कंगना रणौतचं वर्कफ्रंट

कंगनाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती आता 'इमर्जन्सी' या पीरियड ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ती स्वतः करत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

याशिवाय ती पॅन इंडिया सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही दिसणार असून या चित्रपटात आर माधवन तिच्यासोबत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघातात दोन ठार; मुलाच्या शिक्षणासाठी चौकशी करण्यास गेलेल्या बापाचा मृत्यू जिवाला चटका लावणारा...

Ajit Pawar: शेरवानी, फेटा अन् गॉगल… लूक बदलला, ताल जुळला! लेकाच्या लग्नात अजित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स व्हायरल, दादांचा लूक तर पाहा

Latest Marathi News Live Update : बाबासाहेबांनी समाजातील विषमता दूर केली; चैत्यभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Streetlights : पथदिव्यांनी उजळणार निर्जन स्थळे; महिलांच्या सुरक्षेसाठी २७४ ठिकाणी विद्युतव्यवस्था

Karad Police : कराडात राडा! मतदानादिवशी खुन्नस दिल्याच्या कारणावरून वाद; १० जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT