Kangana Ranaut calls herself ‘Batman’ after Anurag Kashyap, Hansal Mehta praise her Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: अनुराग कश्यप-हंसल मेहता यांच्या कौतुकानंतर 'बॅटमॅन' म्हणत कंगनानं स्वत:लाच दिली शाबासकी

Vaishali Patil

बॉलीवूडची पंगा क्विन कंगना रणौत हिची काही वेगळी ओळख देण्याची गरज नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. कुणी तिच्यावर टीका केली तर कंगनाही त्याला उत्तर देतेच.

अनुराग कश्यप आणि हंसल मेहता यांनी नुकतेच कंगना राणौतचे कौतुक केले होते. आता दोन्ही चित्रपट निर्मात्यांच्या कौतुकानंतर कंगनाने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही दिग्दर्शकांचे आभार मानत तिने स्वत:ला बॅटमॅन म्हटलं आहे.

काही दिवसांपुर्वीच अनुराग कश्यपने कंगना राणौतसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव शेअर करत सांगितले की, कंगना टॅलेंटेड आहे, पण तिच्यासोबत काम करणं अवघड आहे त्यांनी तिला तगडी अभिनेत्री म्हटले. हंसल मेहता यांनीही मतभेद बाजूला ठेवत कंगनाच्या कलेचे कौतुक केले होते. आता कंगनाने या दोघांसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे.

या पोस्टमध्ये कंगना लिहिते की, "सर्वजण यावर सहमत आहेत, डावे आणि उजवे. दोन्ही . 1- पहिले तर मी खूप वाईट स्वभावाची आहे. 2-मी हिंसक आणि अतिरेकी देखील आहे, मला हिंसा आवडते. 3-मी थोडी बिघडलेली आणि खूप हट्टी आहे. 4- अत्यंत प्रतिभावान, म्हणजे G.O.A.T प्रकार. याला बॅटमॅन म्हणतात...ती मीच आहे."

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांच्या तेजस या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'इमर्जन्सी' मध्ये दिसणार आहे. त्यातबरोबर ती साउथच्या 'चंद्रमुखी 2'मध्ये दिसणार आहे. ज्याचा ट्रेलर काही दिवसांपुर्वीच रिलिज झाला आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT