Kangana Ranaut Vikrant Massey  
मनोरंजन

'आणा माझी चप्पल'; 'झुरळ' म्हणत अभिनेत्यावर भडकली कंगना

यामीची तुलना 'राधे माँ' यांच्याशी केल्याने कंगनाचा राग अनावर

स्वाती वेमूल

अभिनेत्री कंगना राणावतला Kangana Ranaut कधी, कोणत्या गोष्टीचा राग येईल याचा नेम नाही. अभिनेत्री यामी गौतमच्या Yami Gautam लग्नाच्या फोटोंवर कमेंट करणाऱ्या अभिनेता विक्रांत मेस्सीवर Vikrant Massey ती भडकली आहे. यामीने 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केलं. लग्नापूर्वीच्या काही विधींचे फोटो तिने रविवारी सोशल मीडियावर पोस्ट केले. पारंपरिक पोशाख, हातात बांगड्या आणि कलीरा असा तिचा लूक पाहून अभिनेता विक्रांत मेस्सीने तिची तुलना राधे माँ यांच्याशी केली. 'शुद्ध आणि पवित्र, अगदी राधे माँसारखं', असं त्याने लिहिलं. ही कमेंट वाचून कंगनाचा पारा चढला आणि तिने सोशल मीडियावर त्याला उत्तर दिलं. (Kangana Ranaut calls Vikrant Massey a cockroach for calling Yami Gautam Radhe Maa)

'कुठून निघालं हे झुरळ, आणा माझी चप्पल', अशा शब्दांत कंगनाने विक्रांतला उत्तर दिलं. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे दोन गट पडले. यात काहींनी कंगनाची बाजू घेतली आणि विक्रांतला सुनावलं. तर काहींनी विक्रांतला पाठिंबा दिला. यामीदेखील कंगनाप्रमाणेच हिमाचल प्रदेशची असून तिचा लग्नसोहळासुद्धा तिथेच पार पडल्याचं समजतंय.

कंगनाने यामीचा फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. 'पहाडी मुलीला वधू होताना पाहण्यापेक्षा सुंदर अनुभव दुसरा कुठला असू शकत नाही', अशा शब्दांत कंगनाने आनंद व्यक्त केला होता. यामी ही हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर इथली आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT