Kangana Ranaut Chandramukhi 2 Released date postponed esakal
मनोरंजन

Kangana Ranaut : कंगना शाहरुखच्या 'जवान'ला घाबरली? 'चंद्रमुखी २' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली!

कंगनानं पहिल्यांदाच शाहरुखचे एवढे कौतुक केले असेल अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Chandramukhi 2 Released date postponed : बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. वादग्रस्त काही बोलणे, त्यावर प्रतिक्रिया देणे, सगळ्यांपेक्षा नेहमीच वेगळी भूमिका मांडणे यामुळे कंगनाला मिळणारी प्रसिद्धीही मोठी असते.

कंगना सध्या शाहरुखच्या जवानवर खूपच फिदा झाल्याचे दिसून आले आहे. किंग खाननंच्या जवाननं कंगनाचं लक्ष वेधून घेतले आहे. कंगनानं पहिल्यांदाच शाहरुखचे एवढे कौतुक केले असेल अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. अशातच कंगनाच्या चंद्रमुखी २ विषयी जी पोस्ट व्हायरल झाली आहे त्यावरुन तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Also Read - Dahi Handi - गुंतवणुकीची उतरंड कशी हवी याचा धडा देणारा उत्सव

एक्सवर कंगनाचा चंद्रमुखी २ हा ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्याची रिलिज डेट १९ सप्टेंबर होती. आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. मात्र नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Kangana Ranaut Chandramukhi 2 Released date postponed

कंगनानं शाहरुखच्या जवानला घाबरुन तर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नाही ना, असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. पी वासू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये राघव लॉरेन्स आणि कंगना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता २८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT