Kangana Ranaut Claims Up Cm Yogi Adityanath Got Emotional After Watching Tejas At Special Screening Photos Viral  Esakal
मनोरंजन

Tejas: कंगनाचा फ्लॉप 'तेजस' पाहून मुख्यमंत्री योगींच्या डोळ्यात अश्रू! फोटो शेअर करत अभिनेत्रीने मानले आभार

Vaishali Patil

Kangana Ranaut Tejas CM Yogi: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला बॉलिवूडची पंगा क्विन म्हटलं जातं. कंगना तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगना तिच्या आगामी चित्रपट 'तेजस' साठी चर्चेत होती. कंगनाने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कसलीच कमी केली नाही.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने अनेक राजकिय नेत्यांच्या भेटी घेतल्या मात्र या प्रमोशनचा फारसा परिणाम तिच्या चित्रपटाला झाला नसल्याचे बॉक्स ऑफिसच्या आकड्यावरून दिसते.

तेजस या चित्रपटात कंगनाने एअरफोर्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिने लाडकू विमान उडवणाऱ्या महिला अधिकारी तेजस गिलची भुमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी कंगनाने खुप मेहनतही घेतली होती.

आता कंगनाचा तेजस हा सिनेमा यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी पाहिला आहे. कंगनाने यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

उत्तर प्रदेश सरकारसाठी तेजसचे विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनीही हा चित्रपट पाहिला आहे. कंगना रणौतने या स्क्रीनिंगचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. यासोबतच तिने सीएम योगींनी चित्रपट पाहिल्यानंतर ते भावुक झाल्याचे सांगितले.

कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर तेजसच्या स्पेशल स्क्रिनिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सीएम योगी यांच्यासोबत पोज देताना दिसते तर दुसऱ्या फोटोत सर्व चित्रपटाचा आनंद घेत आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिले की, "आज तेजस चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय हवाई दलातील एका धाडसी अधिकाऱ्याच्या जीवनावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा चित्रपट पाहिला आणि तेजसच्या शेवटच्या डायलॉगमध्ये त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. ते फोटोत दिसत आहे. 'सैनिकाला काय हवे असते?"

पुढे ती लिहिते, "आमच्या सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि त्याग पाहून सीएम योगी हे इतके भावूक झाले की त्यांचे डोळे पाणावले. धन्यवाद योगी जी, तुमच्या कौतुकाने आणि आशीर्वादाने आम्ही धन्य झालो आहोत."

एकीकडे कंगनाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे तर दुसरीकडे दिवसेंदिवस चित्रपटाच्या कलेक्शनचा आलेख खाली जात आहे.

कंगनाच्या तेजसने पहिल्या दिवशी केवळ 1.25 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती तर शनिवारी 1.3 कोटी आणि रविवारी 1.20 कोटींची कमाई केली. तर सोमवारी या चित्रपटाने फक्त 50 लाख रुपये कमावले असून आता या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 4.25 कोटी रुपये झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT