Kangana On Sid-Kiara Wedding Esakal
मनोरंजन

Kangana On Sid-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा देतांना कंगनाचा आलियाला अप्रत्यक्ष टोमणा..

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे अखेर लग्न बंधनात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिड-कियारा जवळच्या नातेवाईकांच्य उपस्थित विवाह बंधनात अडकले.

या लग्नाला अनेक सिनेतारकांनीही हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटीही सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

करण जोहर, मनीष मल्होत्रा ​​ते भेडिया अभिनेता वरुण धवन, कतरिना कैफ, विकी कौशल, आयुष्मान खुराना अशा अनेक तारकांनी त्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या मात्र यात एका अभिनेत्रीच्या शुभेच्छेची सध्या चर्चा सुरु आहे.

दरम्यान, रश्मी रॉकेट आणि मलंग यांसारख्या चित्रपटांचे पटकथा लेखक अनिरुद्ध गुहा यांनी सिड-कियाराचा एक फोटो शेअर केला आणि विचारले की ते डेटिंग करत होते का? यावर अभिनेत्री कंगना राणौतने प्रतिक्रिया देत बॉलीवूडला पुन्हा लक्ष्य केले.

ट्विटला उत्तर देताना कंगना रणौतने लिहिले, “हो ते करत होते, पण ते ब्रँड किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नव्हते. लक्ष वेधून घेण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी कधीही बॉलीवूडमधील नातेसंबंधांची नौटंकी केली नाही... एकदम खरं प्रेम आहे, सुंदर जोडपं.”.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला लग्न केले. लग्नाच्या काही तासांनंतर, कियारा आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या चाहत्यांसह लग्नाची पहिली छायाचित्रे शेअर केले आणि लिहिले, "आता आमची कायमची बुकिंग झाली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

SCROLL FOR NEXT