actress kangana ranaut  Team esakal
मनोरंजन

जावेद अख्तर यांनी घेतली 'ताडका' राक्षसीची भेट 'बॉलीवूड क्वीनची' टीका

बॉलीवूडची क्वीन म्हणून प्रसिद्ध असणारी कंगना ही तिच्या वाचाळपणासाठी लोकप्रिय आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची क्वीन (bollywood queen) म्हणून प्रसिद्ध असणारी कंगना (kangana ranaut) ही तिच्या वाचाळपणासाठी लोकप्रिय आहे. तिच्या अशा प्रकारच्या वाचाळपणामुळे तिला अनेकदा मोठ्या संकटांनाही सामोरं जावं लागलं आहे. मात्र त्याचा कंगणाच्या वागण्यावर काही एक परिणाम झालेला नाही. व्टिटरनं तिचे अकाउंट बेताल वक्तव्य केल्यामुळेच डिलिट केले आहे. त्यानंतर कंगना ही इंस्टावर जास्त काळ सक्रिय असते. त्याच्या माध्यमातून ती वेगवेगळ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसते. सध्या तिनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जी प्रतिक्रिया व्यक्त केलीय ती चर्चेत आहे. (Kangana Ranaut commented Mamata Banerjee Tadaka BollyDawood Now Project Her As Godd yst88)

kangana ranaut

कंगनाला तिच्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे न्यायालयानं अनेकदा समजही दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याशी वाद घातला होता. त्यांना अर्वाच्य शब्द वापरले होते. त्यामुळे अख्तर यांनी तिच्याविरोधात मानहानीचा दावाही कोर्टात ठोकला आहे. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सध्या जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी ममता बॅनर्जी यांची घेतलेली भेट चर्चेत आहे. त्यांच्या या भेटीवर कंगनानं परखड प्रतिक्रिया दिली आहे. तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

कंगनानं आपल्या पोस्टमध्ये जावेद अख्तर, शबाना आझमी आणि ममता बॅनर्जी यांचा एक फोटो शेयर केला आहे. त्याविषयी लिहिलं आहे की, काल शबाना आझमी, जावेद अख्तर यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. ज्यांना सर्वजण ताडका राक्षसीच्या नावानं ओळखले जाते त्यांच्यासोबत मिटिंग झाली आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आता बॉलीवूड माफियांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये होस्टिंग करताना दिसणार आहे.

बॉलीवूडचे जे तीन खान आहेत त्यांच्यावर आता ते प्रेशर्स क्रिएट करतील आणि खान मोठ्या प्रॉडक्शन हाऊसला आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळेजण मिळून ताडकाला देवी बनवतील. वेगळ्या विचारानं सध्या काही कार्यक्रम सुरु झाले आहेत. मात्र हे विसरता कामा नये की, मी सगळ्या देशद्रोह्यांना चव्हाट्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशाराही कंगनानं दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT