kangna 
मनोरंजन

जयललितांच्या लूकमध्ये दिसली कंगना रनौत, व्हायरल झाले फोटो

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- महाराष्ट्र सरकारसोबतच्या वाद विवादांमध्ये अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'थलायवी' सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बनत असलेल्या या सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे. हा सिनेमा कंगनाच्या महत्वाकांश्री प्रोजेक्टपैकी एक समजला जातो. या सिनेमात जयललिता यांच्या लहानपणापासून ते तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा जीवनप्रवास दाखवला जाईल.

अभिनेत्री कंगनाने ट्विटरवर थलायवीच्या सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये तिचा जबरदस्त लूक दिसून येतोय. आता कंगनाचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतोय. कंगनाने हे फोटो पोस्ट करताना लिहिलंय, 'जया मां यांच्या आशिर्वादाने थलायवीचं आणखी एक शेड्युल पुर्ण झालं आहे. कोरोनाच्या या काळात भरपूर काही बदललेलं आहे. मात्र ऍक्शन आणि कटमध्ये काहीही बदलेलं नाही. संपूर्ण टीमचे आभार.'

या फोटोंची खास गोष्ट म्हणजे कंगना सेम टू सेम जयललिता सारखी दिसतेय. तिचा मेकअप अशा अंदाजात केला आहे ज्यामध्ये तीचा लूक जयललिता यांच्यासारखा प्रभावी दिसून येतोय. कोरोनामुळे शूटींगसाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी परिस्थिती सामान्य होई पर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे कारण यातील एका क्लायमॅक्स सीनसाठी जवळपास ३५० लोकांची गरज आहे.    

kangana ranaut finished chennai schedule of her next film thalaivi shared some pics  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT