मनोरंजन

भर पत्रकार परिषदेत पत्रकारांवर भडकली कंगना रानावत (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

मुंबई- बॉलिवूडची क्वीन कंगना रानावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता कंगनाचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. जजमेंटल है क्या या सिनेमातील नवीन गाण्याच्या लॉन्चवेळी कंगनाचं एका पत्रकाराशी जोरदार वाद झाला आहे.

एकता कपूर, कंगना रानावत आणि राजकुमार राव त्यांच्या आगामी जजमेंटल है क्या सिनेमातील एका रीमिक्स प्रमोशनल गाण्याच्या लॉन्चला पोहोचले होते. पत्रकार परिषद सुरू असताना जस्टिन राव या पत्रकाराने आपलं नाव सांगून प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा कंगनाला जस्टिनशी निगडीत एक जुनी गोष्ट कंगनाला आठवली. मणिकर्णिका या तिच्या सिनेमाशी निगडीत जस्टिनने एक बातमी तिच्याविरुद्ध छापली होती. मग काय कंगनाने मागचा पुढचा विचार न करता जस्टिनला सर्वांसमोर सुनवायला सुरुवात केली. दोघांमधील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगनाच्या या वादामुळे पत्रकार परिषदेला एक वेगळंच वळण आलं. जस्टिन रावच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी कंगनाने त्याच्यावरच अनेक आरोप केले. जस्टिनने मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी सिनेमाबद्दल पूर्वग्रह मनात ठेवून नकारात्मक लिहिले. तसेच तिच्याबद्दलही अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या. यावर जस्टिन म्हणाला की, 'कंगना तू माझ्यावर असे आरोप करू शकत नाही. मी तुझ्याबद्दल कधीही चुकीचं लिहिलेलं नाही.' जस्टीनने अनेकदा आपलं म्हणण मांडलं तरी कंगना त्याच्यावर ओरडण्याची काही थांबली नाही.

हे प्रकरण थांबलं नाही तर मणिकर्णिका सिनेमाशी संबंधीत मुलाखतीसाठी हा पत्रकार व्हॅनिटी वॅनमध्ये तीन तास थांबला होता आणि त्याने अनेकदा पर्सनल मेसेजही केले. या सर्व वादात जस्टिन अगदी शांतपणे आणि सन्मानाने एकच गोष्ट वारंवार सांगत होता की त्याने कधीही कंगनासोबत लंच केला नाही. तसेच तो तिच्या व्हॅनिटी वॅनमध्येही गेला नाही. पण कंगना त्याचं काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT