Kangana Ranaut Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: कंगना राणौतने इंडस्ट्रीत 17 वर्षे केली पूर्ण...फोटो शेअर करत दिग्दर्शकलाच म्हणाली, 'वेडा आहेस तू..'

Vaishali Patil

अभिनेत्री कंगना राणौत हे मनोरंजन विश्वातलं असं नाव आहे जे तिच्या चित्रपटांमुळे कमी आणि तिच्या वक्यव्यामुळे जास्त चर्चेत असतं. कंगना राणौत गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते मात्र, तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे कंगनाही अडचणीत येते. कंगना आपले मत उघडपणे मांडते. कंगना स्वतःला अभिनेत्यापेक्षा कमी मानत नाही. त्यामुळेच ती गेल्या काही वर्षांपासून केवळ स्वबळावरच चित्रपट देत आहे.

कंगना ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. ती कधी ट्विटरवर तर कधी इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत असते. ज्या नंतर चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान कंगनाने एक जुना फोटो शेअर केला आहे.

कंगना शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती चित्रपट दिग्दर्शक अनुराग बासूसोबत बसलेली दिसत आहे. फोटोत अनुराग चित्रपटाच्या सेटवर कंगनाला काहीतरी समजावताना दिसत आहे. खरे तर हा 'फोटो लाइफ इन अ मेट्रो'च्या सेटवरील आहे. या चित्रपटातून अनुरागने कंगनाला संधी दिली. हा फोटो शेअर करताना कंगनाच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Kangana Ranaut

अनुराग बसू दिग्दर्शित लाइफ इन अ मेट्रो चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. शनिवारी कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीवर याच चित्रपटाच्या सेटशी एक फोटो शेअर करत लिहिले, "या वेड्या प्रतिभाशाली अनुराग बसूचे आभार ज्याने मला 17 वर्षांपूर्वी 28 एप्रिल 2006 रोजी लॉन्च केलं. येथे तो आणि मी मेट्रो सेटवर आहे (2006) , तो मला असे प्रशिक्षण देत आहे....'तू चुप बस' हे प्रशिक्षणादरम्यान त्याचं आवडतं वाक्य होत...आय लव्ह यू अनु...हे सर्व आहे त्यासाठी धन्यवाद.'

अन् हसत हसत कंगनाने त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी दिग्दर्शकाचे आभार मानले. कंगनाने तिच्या कॅप्शनमध्ये पुढे लिहिले की, तिला सांगण्यात आलं की अभिनेत्रींचं शेल्फ लाइफ 4-5 वर्षे असते परंतु तिने 17 वर्षे पूर्ण केली आहेत.

लाइफ इन अ मेट्रोचे दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले होते. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त धर्मेंद्र, नफिसा अली, शिल्पा शेट्टी, केके मेनन, शायनी आहुजा, इरफान खान, कोंकणा सेनशर्मा आणि शर्मन जोशी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

कंगनाने 2006 मध्ये 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कंगना लवकरच चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे. ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा हा पुढचा भाग असेल. कंगनाने नुकतेच 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

'असा व्यक्ती शोधा ज्याच्यासमोर तुम्ही' श्रद्धाने बॉयफ्रेंडबद्दल व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...Viral Video

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

काय सांगता! 'सेल्फी मैंने ले ली आज' फेम ढिंच्याक पूजा अडकली लग्नबंधनात; नेटकरी म्हणाले- कुणाचे इतके वाईट दिवस आले की...

SCROLL FOR NEXT