kangana 
मनोरंजन

कंगनाने जुन्या आठवणींना दिला उजाळा, हॉस्टेल डेजमधील कंगनाचा लूक पाहिलात का...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमध्ये सेलिब्रेटी मंडळींनी एक नवा ट्रेण्ड सुरू केला आहे. आणि तो ट्रेण्ड म्हणजे जुने फोटो शेअर करणं. काही कलाकार त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत आपल्या आठवणी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत आहेत, तर काहींनी लॉकडाऊनपूर्वी झालेल्या शूटदरम्यानचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांचे जुने फोटो, व्हिडिओ पाहण्यात नेटकरीही रमले आहेत. आता सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतदेखील तिच्या जुन्या आठवणींमध्ये रमली आहे.

कंगनाने हॉस्टेलमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं. अभिनेत्री बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून शहरात आलेल्या कंगनाने बॉलिवूडमध्ये आता स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण अभिनेत्री बनण्यापूर्वी कंगना नेमकी कशी दिसत होती, तिचं लाईफस्टाईल काय होतं हे आता तिच्या जुन्या फोटोंवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. कंगना या फोटोजमध्ये तिच्या मेत्रिणींबरोबर दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे तर काही फोटोजमध्ये तिने साडी परिधान केलेली आहे.

विशेष म्हणजे कंगना आता जशी स्टायलिस्ट आहे तशीच याआधीही होती हे तिच्या फोटोंवरून स्पष्टपणे दिसतं. जुन्या फोटोंमध्ये अगदी कंगना उठून दिसत आहे.  हॉस्टेलमधील दिवसांमध्ये आणि त्या आठवणींमध्ये सध्या कंगना रमली आहे.

कंगनाच्या या जुन्या फोटोंना तिच्या चाहत्यांनीदेखील खूप पसंती दिली आहे. कंगनाने चंदीगढ येथील डीएवी या गर्ल्स स्कूलमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. हॉस्टेलमध्ये राहून तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. याशिवाय अभिनय क्षेत्रात काम मिळविण्यासाठी तिला बरीच मेहनत करावी लागली. कुटुंबामधून कोणीच या क्षेत्रात नसताना स्वबळावर चित्रपटसृष्टीत काम करणं तिच्यासाठी आव्हानात्मकच होतं. करिअरच्या सुरुवातीला अभिनेता आदित्य पांचोलीने कंगनाला फार मदत केली. मात्र आदित्य-कंगनाचं नंतर खटकलं आणि नव्या वादाला तोडं फुटलं. कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. पण सध्या तरी वाद बाजूला सारून कंगना सोनेरी आठवणींमध्ये रमली आहे.

kangana ranaut hostel life photos with friends

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT