मुंबई : अभिनेत्री कंगना राणावने 5 दिवसानंतर मुंबईतून मनालीला रवाना झाली आहे. तिच्यासोबत बहिन रंगोली चंदेल आणि तिचा सहकारी देखील सोबत होता. मुंबईहून परतण्यापूर्वी कंगनाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. मुंबई महानगर पालिकेने कार्यालयावर केलेल्या कारवाईसंदर्भात न्याय मिळावा, अशी मागणी तिने राज्यपालांना केली होती. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून मुंबई सोडत असल्याची माहिती दिली आहे.
तिने ट्विटमध्ये लिहिलंय की, मुंबई सोडताना खूप दु:ख होत आहे. मागील काही दिवसांत मी दहशतीत होते. कार्यालय तोडल्यानंतर माझे घर तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मला शिवीगाळीचा सामना करावा लागला. सुरक्षिततेसाठी हत्यारबंद जवानसोबत फिरणे म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये वावरत असल्यासारखेच होते, असे म्हणत तिने जाता जाता मुंबईची पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केलीय. एवढेच नाही तर महाआघाडी सरकारमध्ये लोकशाही संपुष्टात आल्याचे दिसते, असा आरोपही कंगनाने केला आहे. आणखी एका ट्विटमध्ये तिने लिहिलंय की, रक्षकच भक्षक बनून लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम करताना दिसते. एका महिलेला धमकावून तिला कमी लेखून राज्य सरकार आपली प्रतिमा मलिन करत आहे, असा उल्लेखही कंगनाने ट्विटमध्ये केलाय.
कंगना राणावत 9 सप्टेंबर रोजी आव्हान देऊन मुंबईत दाखल झाली होती. सुशांतसिह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड करण्याचे भाष्य कंगनाने केले. यावेळी तिने मुंबई पोलिस आणि राज्य सरकारसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. ट्विटरच्या माध्यमातून तिने केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील काही संघटनांनी तिला मुंबईत येण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या सुरक्षा कवचात ती मुंबईमध्ये दाखल झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.