Kangana Ranaut Sakal
मनोरंजन

Lock Upp Teaser: कंगना रनौत घेणार 16 सेलेब्रिटींची शाळा, म्हणाली...

कंगनाचा वेगळी स्टाईल पुन्हा एकदा समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) लवकरच डिजिटल जगात पाऊल ठेवणार असून, लवकरच ती 'लॉक अप' (Lock Upp) नावाचा रिअॅलिटी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये कंगना हा शो होस्ट करताना दिसणार असून, नुकतेच या शोचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आज या शोचा टीझर रिलीज झाला आहे (लॉक अप टीझर आउट). टीझरमध्ये कंगनाचा वेगळी स्टाईल पुन्हा एकदा समोर आली आहे, यात तिने स्पष्टपणे सांगितले आहे की, हे जेल तिचे असेल आणि इथले नियमही तिचेच असतील. शोचा ट्रेलर 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

'लॉक अप'चा टीझर आऊट

कंगना रनौतच्या नवीन शो 'लॉक अप' चा टीझर आल्ट बालाजी (Alt Balaji), मॅक्स प्लेअर (MX Player) आणि पंगा क्वीन (Panga Queen) यांनी त्यांच्या इन्स्टा पेजवरून शेअर केला आहे. या टीझरमध्ये पंगा क्वीनच्या हटके स्टाइलवरूनहा शो धांसू असेल याची कल्पना करता येऊ शकते.

टीझरमध्ये नेमके काय

प्रदर्शित करण्यात आलेल्या लॉक अपच्या टीझरच्या व्हिडिओची सुरुवात कंगनाने होते, ज्यामध्ये ती एका चमकदार ड्रेसमध्ये दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये कंगना म्हणते की, 'या जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक मला आवडणारे आणि दुसरे ते बी ग्रेड स्ट्रगलर्स जे माझी बतनामी करून चर्चेत राहतात. माझे आयुष्य 24*7 रिअॅलिटी शो बनवून ठेवले असे म्हणत कंगना पुढे म्हणते की, पण आता माझी वेळ आहे. कारण मी घेऊन येत आहे 'द फादर ऑफ बिगेस्ट रिअॅलिटी शो' माय जेल माय रुल्स आणि यामध्ये 16 कॉन्ट्रोव्हर्शियल सेलेब्स असतील, जे की माझ्या तुरुंगात असतील, त्यांच्यासोबत तेच होईल जे मला हवं आहे' असे म्हणत येथे वडिलांच्या पैशातूनही जामीन मिळणार नाही असे देखील कंगना म्हणताना दित आहे.

16 सेलिब्रिटींना तुरुंगवास

लॉक अप हा शो सेलिब्रिटींवर आधारित रिअॅलिटी शो असणार असून, ज्यामध्ये 16 स्पर्धकांना सुमारे 72 दिवस दोन तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naxalites Support Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'वोटचोरी'च्या आरोपांना नक्षलवाद्यांचाही पाठिंबा...११ पानी पत्रक जारी करत दिलं समर्थन!

Maharashtra Govt Jobs : भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती, राज्य सरकारची मान्यता

Sunday Morning Breakfast : रविवारी ब्रेकफास्टला बनवा कुरकुरीत बीटचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

SCROLL FOR NEXT