मनोरंजन

'जेवढं कमावलं तेवढं गमावलं, काय ते कपडे'; कंगना ट्रोल

युगंधर ताजणे

आपल्या परख़ड स्वभावासाठी आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना kangana ranaut आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत वावरणारी कंगना तिच्या कपड्यांवरुन ट्रोल troll होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला ट्रोल केले जात आहे. अर्थात कंगना यासगळ्या गोष्टी फारशा मनाला लावून घेत नसली तरी तिनं यापूर्वी कपड्यांवरुन जी विधानं केली होती त्यावरुन ती ट्रोल होताना दिसत आहे. कंगना सध्या तिच्या एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी परदेशी गेली आहे. त्याठिकाणी तिनं केलेलं फोटोशुट हे चर्चेत आलं आहे. तिला ट्रोलर्सनं चांगलचं सुनावलं आहे.

काही महिन्यांपूर्वी कंगनानं पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणूकीविषयी वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. त्यामुळे तिचं व्टिटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर तिनं इंस्टावरुन आपली वादग्रस्ते वक्तव्य सुरुच ठेवली. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर टीका करणंही तिला महागात पडलं आहे. तिचं ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अनेक वाद ओढवून घेणं आणि त्यावरुन लक्ष वेधून घेणं हे आता कंगनासाठी अंगवळणी पडलं आहे. चाहतेही तिच्या या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे ट्रोलर्सनं तिला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कंगनानं मोनोकनी परिधान करुन सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. याशिवाय तिनं अनेक बोल्ड फोटोही शेयर केले आहेत. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात येत आहे. कंगनाचे हे फोटो बुडापेस्टमधील वॉटरपार्कचे आहेत. त्यात ती आपली बहिण आणि तिचा मुलगा याच्यासमवेत गेली आहे. त्या फोटोंमध्ये कंगनाचं एक वेगळचं रुप पाहायला मिळालं आहे. त्यावेळी ट्रोलर्सनं कंगनावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जीन्स फाटल्यावर दुसऱ्यांना ज्ञान शिकवणारी कंगना आता अशा प्रकारचे कपडे कसे काय परिधान करते असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

एका ट्रोलर्सनं तिला तिच्या कपड्यांवरुन चांगलंच झापलं आहे. त्या व्यक्तीनं म्हटलं आहे की, इतरांना भारतीय संस्कृतीचे धडे देणारी कंगना स्वत; मात्र काहीही कपडे घालून ते फोटो शेयर करते. याला काय म्हणावे, हा मोठा विनोद आहे. यापूर्वी कंगनानं इतर अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन सडकून टीका केली होती. आता तिचे कपडे पाहून काय बोलावं हा प्रश्न आहे. हे काय कपडे आहेत का, असा सवालही त्या ट्रोलर्सनं विचारला आहे. दुसऱ्या ट्रोलर्सनं तिला म्हटलं आहे की, कंगना दिवसेंदिवस तुझे कपडे कमी होत चालले आहेत. याविषयी तु काय सांगशील, तुला नेमकं कुठे जायचे आहे असा प्रश्न त्या ट्रोलर्सनं यावेळी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT