Kangana Ranaut  
मनोरंजन

Kangana Ranaut : कंगनाला लवकरच प्रपोज करणार! कोण आहे तो 'सुपरस्टार'?

कंगनाच्या बाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तिला एक सुपरस्टार प्रपोज करणार आहे.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Love Story : बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. सध्या कंगना आणि करण जोहरमध्ये जोरदार वाद सुरु झाला आहे. त्याचे कारण करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र कंगनाला तो काही आवडलेला नाही.

कंगनानं करणनं तोफ डागली आहे. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे तो कलाकारांना भरपूर पैसे देऊन काहीही करायला सांगतो आणि प्रेक्षक ते पाहतात. अशा शब्दांत कंगनानं तिची नाराजी व्यक्त केली होती. अशातच कंगनाच्या बाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तिला एक सुपरस्टार प्रपोज करणार आहे. त्यानं आता कंगनाला प्रपोझ करण्याची वेळ आली आहे. असे त्या सुपरस्टारनं म्हटले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

त्याचं काय आहे की, सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर प्रकाश कुमार उर्फ पुनीत सुपरस्टार आता काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी २ मध्ये दिसला होता. आता त्याचे नाव आणखी एका रियॅलिटी शो सोबत जोडले जात आहे. पुनीतनं लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होण्याबाबत बातचीत केली आहे. काही दिवसांपूर्वी पुनीतचं इंस्टा अकाउंट ब्लॉक झाले होते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती.

पुनीतनं आता म्हटले आहे की, मला काही गोष्टींसाठी गोपनीयता पाळावी लागली. ते महत्वाचे आहे. आता मी खास प्लॅनिंग केले आहे. मला कंगनाच्या लॉक अप २ मध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यात मी तिला प्रपोझ करणार आहे. ती माझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आहे. असेही त्यानं म्हटलं आहे. यासगळ्यात कंगना पुनीतला शो मध्ये घेणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसरीकडे तीन मिलियनपेक्षाही जास्त फॉलोअर्स असणाऱ्या पुनीतचं इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक झाले असल्यानं त्याचे चाहते नाराज झाले आहेत. पुनीतनं त्याचे अकाउंट ब्लॉक झाले याला कारण एमसी स्टॅनचे फॅन्स आहेत. असे म्हटले आहे. पुनीत चे चाहते आणि एमसी स्टॅनचे चाहते यांच्यात वाद सुरु झाला होता. त्यामुळे पुनीतच्या अकाउंटविषयी रिपोर्ट करण्यात आला. असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT